FD मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात ? मग SBI अन IDBI बँकेच्या ‘या’ स्पेशल योजनेत पैसे गुंतवा, कमी दिवसात श्रीमंत होणार

आरबीआय ने पाच वर्षांनी पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के इतका कमी केला आहे. म्हणजे रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. आता रेपो रेट कमी झाला असल्याने साहजिकच याचा परिणाम फिक्स डिपॉझिट वरील व्याजदरावर देखील होणार आहे.

Tejas B Shelar
Published:

SBI And IDBI Bank Special FD : जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर सध्या फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज दिले जात आहे. यामुळे, हा काळ एफडी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे.

दरम्यान आरबीआय ने पाच वर्षांनी पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के इतका कमी केला आहे. म्हणजे रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

आता रेपो रेट कमी झाला असल्याने साहजिकच याचा परिणाम फिक्स डिपॉझिट वरील व्याजदरावर देखील होणार आहे. जेव्हा रेपो रेट कमी होतात तेव्हा फिक्स डिपॉझिट वरील व्याजदर देखील कमी होत असते. यामुळे आगामी काळात विविध बँका फिक्स डिपॉझिट वरील व्याजदरात बदल करतील आणि कपातीचा निर्णय घेतील असा एक अंदाज आहे.

म्हणून ज्या लोकांना फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांनी लवकरात लवकर गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा असा सल्ला जाणकार देत आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय या दोन्ही बँकांच्या स्पेशल FD योजनांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया ची 400 दिवसांची स्पेशल एफडी योजना

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांची विशेष FD योजना ऑफर करत आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून सामान्य एफडीच्या तुलनेत अधिकचे व्याज दिले जात आहे.

एसबीआयच्या अमृत कलश एफडी योजना असे नाव देण्यात आले असून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.10% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60% दराने परतावा दिला जात आहे. अर्थातच सीनियर सिटीजन ग्राहकांना यात 0.50% अधिकचा परतावा दिला जातोय.

मात्र एसबीआयच्या या विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ग्राहकांनी 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. कारण की यानंतर या योजनेत गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार नाही. 31 मार्च ही या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची डेट आहे.

आयडीबीआय बँकेची विशेष FD योजना

आयडीबीआय बँकेकडून उत्सव कॉलेबल एफडी योजना ऑफर केली जात आहे. ही योजना 555 दिवसांची आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून चांगले व्याज दिले जात आहे.

यात सामान्य ग्राहकांना 7.40% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.90% दराने परतावा दिला जातोय. मात्र या योजनेत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर 31 मार्च ही शेवटची तारीख आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe