एसबीआयच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! एटीएम कार्ड वापरण्यासाठी द्यावे लागतात ‘हे’ 4 प्रकारचे शुल्क

Published on -

SBI ATM Card Rule : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. जर तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल आणि तुमच्याकडे एसबीआयचे एटीएम असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की आज आपण एसबीआय बँक एटीएम कार्ड वापरण्यासाठी कोणकोणते शुल्क वसूल करते या संदर्भात माहिती पाहणार आहोत. खरे तर एसबीआयच्या अनेक ग्राहकांना एटीएम कार्ड हे बँकेकडून फ्री मध्ये मिळते असे वाटते.

तसेच याचा वापरही फ्री मध्ये करता येतो असा अनेकांचा समज आहे. मात्र असे नाही एसबीआय बँक एटीएम कार्ड जारी करण्यासाठी तसेच याच्या वापरासाठी काही शुल्क वसूल करत असते. दरम्यान आज आपण याच शुल्काची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआय एटीएम कार्डसाठी कोणते शुल्क द्यावे लागते
1) एटीएम कार्ड अर्थात डेबिट कार्ड जारी करण्याचे शुल्क : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक क्लासिक/सिल्व्हर/ग्लोबल/कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड ग्राहकांना देताना कोणतेही शुल्क वसूल करत नाही. पण, गोल्ड डेबिट कार्डसाठी 100 रुपये + GST आणि प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी 300 रुपये + GST द्यावी लागते.

2) SBI चे डेबिट कार्ड वापरण्यासाठी वार्षिक शुल्क लागते : स्टेट बँक ऑफ इंडिया चे डेबिट कार्ड अर्थातच एटीएम कार्ड वापरण्यासाठी वार्षिक शुल्क देखील भरावे लागते. याला वार्षिक देखभाल शुल्क म्हणून संबोधले जाते. खाते उघडल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून हे शुल्क आकारण्यास सुरुवात होते. वेगवेगळ्या प्रकारच्या कार्डांवर हे शुल्क वेगवेगळे असते. क्लासिक/सिल्व्हर/ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डसाठी रु 200+ GST, युवा/गोल्ड/कॉम्बो/माय कार्ड डेबिट कार्डसाठी रु 250+जीएसटी आणि प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी रु. 325+ GST एवढे देखभाल शुल्क बँकेला द्यावे लागते. शिवाय, प्लॅटिनम बिझनेस रुपे कार्डसाठी रु. 350+ GST आणि प्राइड/प्रिमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी रु 425+जीएसटी असे शुल्क बँकेकडून वसूल केले जाते.

3) डेबिट कार्ड चेंज करण्यासाठी शुल्क लागते : एटीएम कार्ड चेंज करण्यासाठी शुल्क भरावे लागते. तुमचे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले किंवा त्याची एक्सपायरी डेट संपली असेल तर तुम्ही तुम्ही नवीन कार्ड घेऊ शकता. एटीएम रिप्लेस करण्यासाठी किंवा नवीन एटीएम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागते. यासाठी बँकेला 300 रुपये + GST ​​शुल्क भरावे लागेल.

4) आंतरराष्ट्रीय व्यवहार शुल्क : हे शुल्क वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे लागू होते. तुम्ही एटीएममध्ये फक्त शिल्लक तपासल्यास तुम्हाला २५ रुपये + जीएसटी भरावा लागेल. जर तुम्ही एटीएममधून रोख रक्कम काढली तर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी किमान १०० रुपये + व्यवहाराच्या रकमेच्या ३.५ टक्के + जीएसटी भरावा लागेल. जर तुम्ही POS मशीनवर आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा ई-कॉमर्स व्यवहार करत असाल तर तुम्हाला व्यवहाराच्या रकमेच्या 3% + GST ​​शुल्क भरावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe