SBI बँकेत सेविंग अकाउंट आहे का ? मग तुम्हाला बँकेकडून ‘या’ गोष्टी मोफत मिळणार

एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. शिवाय एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील बँकेकडून अधिकचा परतावा दिला जातोय. एवढेच नाही तर जर तुम्ही एसबीआयमध्ये बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा मेंटेन करावा लागणार नाही.

Tejas B Shelar
Published:

SBI Bank News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेच्या संपूर्ण देशभरात शाखा आहेत. यामुळे या बँकेच्या खातेधारकांची संख्याही फार अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे एसबीआय बँकेकडून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.

शिवाय एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील बँकेकडून अधिकचा परतावा दिला जातोय. एवढेच नाही तर जर तुम्ही एसबीआयमध्ये बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा मेंटेन करावा लागणार नाही.

म्हणजेच, एसबीआयच्या या प्रकारातील सेविंग अकाउंट मध्ये पैसे नसले तरीदेखील बँकेकडून कोणतीही पेनल्टी वसूल केली जात नाही. इतर बचत खात्यामध्ये ग्राहकांना मिनिमम बॅलन्स मेंटेन करावे लागते. परंतु एसबीआयच्या या बचत खात्यात ग्राहकांना झिरो बॅलन्स ची सुविधा मिळते.

म्हणजे मिनिमम बॅलन्स मेंटेन केले नाही तरी कोणतेही चार्जेस ग्राहकांना द्यावे लागणार नाहीत. खरे तर देशातील इतर सर्व बँकांकडून मिनिमम बँक बॅलन्स मेंटेन करण्यात आले नाही तर चार्जेस वसूल केले जातात. मिनिमम बॅलन्स मेंटेन केले नाही तर बँका एक ठराविक रक्कम ग्राहकांकडून वसूल करत असते.

परंतु एसबीआयचे हे सेविंग अकाउंट याला अपवाद ठरते. एवढेच नाही तर अशा प्रकारचे बचत खाते बंद करताना देखील ग्राहकांकडून कोणत्याचं प्रकारचे शुल्क वसूल केले जात नाही आणि खाते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी देखील कोणतेच चार्जेस बँक वसूल करत नाहीत.

याशिवाय या प्रकारचे बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना इतरही काही महत्त्वाच्या सुविधा मोफत दिल्या जात आहेत. मोबाईल इंटरनेट बँकिंग सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाते. तसेच डेबिट कार्ड, NEFT/RTGS यांसारख्या चैनलसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत नाहीत.

एका महिन्यात 4 कॅश विड्रॉल सुद्धा मोफत करू शकता. पण हे बचत खाते असेल तर ग्राहकांना चेकबुक साठी मात्र शुल्क द्यावे लागणार आहे. एकंदरीत स्टेट बँक ऑफ इंडिया चे हे सेविंग अकाउंट ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा मोफत देत आहे. यामुळे तुम्हाला जर बचत खाते ओपन करायचे असेल तर तुम्ही एसबीआयमध्ये सेविंग अकाउंट ओपन करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe