SBI Banking News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक, आरबीआय ने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवले आहे. आरबीआय सांगते की, एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी या देशातील तीन अशा बँका आहेत ज्या की पूर्णपणे सुरक्षित आहेत.
दरम्यान, जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेदार असाल, तुमच एसबीआय मध्ये अकाउंट असेल आणि तुम्ही एसबीआयच्या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करत असाल म्हणजे मोबाइल बँकिंग अँप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी हाती येत आहे.

खरेतर एसबीआयने अलीकडेच एक मोठी घोषणा केली आहे आणि या घोषणेमुळे अशा वापरकर्त्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे जे त्यांच्या बँकिंगच्या गरजेसाठी अॅपवर अवलंबून आहेत. या बदलाचे मुख्य कारण चांगली सुरक्षा प्रोव्हाइड करणे आणि परफॉर्मन्स सुधारणे हे आहे.
तंत्रज्ञान जसजसे प्रगत होते तसतसे जुन्या ऑपरेटिंग सिस्टम वापरकर्त्यांच्या आर्थिक डेटाची नवीनतम सुरक्षा अपडेट करू शकत नाहीत. दरम्यान आता या जुन्या Android आवृत्त्यांसाठी सपोर्ट बंद करण्यात आले असून यातून योनोला आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारित करायचा आहे.
म्हणजेच आता काही स्मार्टफोन मध्ये एसबीआयचे Yono एप्लीकेशन चालणार नाही. दरम्यान, जुन्या Android आवृत्ती असणाऱ्या अनेक वापरकर्त्यांनी योनो एपसह समस्या असल्याचे सांगितले आहे. ते त्यांचे अनुभव प्ले स्टोअरवर सुद्धा शेअर करत आहेत.
एका वापरकर्त्याने लिहिले आहे की मी वर्षानुवर्षे योनो एसबीआय अॅप वापरत आहे, परंतु नवीनतम अद्यतन आता केवळ 12 किंवा त्यापेक्षा जास्त Android वर्जन असणाऱ्या फोनलाच सपोर्ट करते.
माझा फोन Android 10 वर चालतो आणि श्रेणीसुधारित करणे हा सुद्धा पर्याय माझ्या फोन मध्ये नाही. म्हणून आता एप्लीकेशनमधील हा बदल पाहता माझ्या फोनसाठी हे एप्लीकेशन निरुपयोगी ठरणार आहे.
खरेतर, Samsung Galaxy S21 Ultra 5G, Samsung Galaxy S20 5G, Google Pixel 4, Samsung Galaxy Note 20 Ultra 5G, OnePlus 8 Pro, OnePlus 9 Pro, POCO X3 Pro अशा अनेक मोबाईल मध्ये सध्या Android 11 वर सुरु आहेत.
पण आता अशा जुन्या हँडसेट मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया चे युनो ॲप्लिकेशन सपोर्ट करणार नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे नक्कीच ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.