नवीन कार खरेदी करण्यासाठी SBI कडून 15 लाखाचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार?

तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची आहे का आणि यासाठी तुम्ही कार लोन घेण्याच्या तयारीत आहात काय ? मग आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण एसबीआयच्या कार लोनची आणि टू व्हीलर लोनची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

SBI Car Loan EMI : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरतर अनेकजण बाईक, कार, घर खरेदी करण्यासाठी बँकांकडून कर्ज काढत असतात.

दरम्यान जर तुम्हालाही नवीन कार किंवा बाईक घ्यायची असेल आणि यासाठी कर्ज काढणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. अलीकडे वाहनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे अनेक जण हप्त्याने कार खरेदी करत आहेत.

दरम्यान, जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एसबीआय बँकेचे कार लोन फायद्याचे ठरणार आहे. कारण एसबीआय बँकेचे कार लोन हे इतर बँकांच्या तुलनेत थोडेसे स्वस्त असते.

एसबीआय कार लोनचे व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. आरबीआयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे.

या बँकेचे करोडो कस्टमर आहेत आणि ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून देते. या बँकेच्या कार लोन बाबत बोलायचं झालं तर बँकेकडून सध्या स्थितीला आपल्या ग्राहकांना 9.20% ते 10.15 टक्के दराने कार लोन उपलब्ध करून दिले जात आहे.

इतर खाजगी क्षेत्रातील आणि फायनान्स कंपन्यांशी तुलना केली असता एसबीआयचा हा व्याजदर परवडणार आहे. मात्र असे असले तरी ग्राहकांनी कार लोन घेण्याआधी सर्व बँकांच्या व्याजदराची तुलना करणे आवश्यक राहणार आहे.

15 लाखांचे कार लोन घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागणार ?

जर समजा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून एखाद्या ग्राहकाने 9.20% इंटरेस्ट रेटवर 15 लाख रुपयांचे कार लोन पाच वर्षांसाठी म्हणजेच 60 महिन्यांसाठी घेतले तर संबंधित ग्राहकाला 31,283 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच संबंधित ग्राहकाला बँकेला एकूण 18 लाख 76 हजार 980 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच संबंधित ग्राहकाला तीन लाख 77 हजार 980 रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्यावे लागतील.

एसबीआयचे टू व्हीलर साठीचे व्याजदर काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे टू व्हीलर साठीचे व्याजदर हे कार लोन पेक्षा थोडेसे अधिक आहे. टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी एसबीआय कडून ग्राहकांना 13.35 ते 14.85% रेटने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

मात्र, इलेक्ट्रिक बाइक खरेदी करायची असल्यास ग्राहकांना 0.50 टक्क्यांची सूट दिली जाऊ शकते अशी माहिती सुद्धा समोर आली आहे.

तसेच ग्राहकांना मंजूर केले जाणारे हे कर्ज सर्वस्वी सिबिल स्कोरवर अवलंबून राहणार आहे. म्हणजे ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असेल त्यांना बँकेकडून कमी इंटरेस्ट रेटवर कर्ज मंजूर होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe