SBI Car Loan : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात स्वतःची कार घ्यायची असेल आणि त्यासाठी तुम्ही कार लोन घेण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण देशातील दोन प्रमुख बँकांच्या कार लोनची माहिती जाणून घेणार आहोत.
एसबीआय आणि आयसीआयसीआय या दोन प्रमुख बँकांकडून कार लोन घेतल्यास किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत.
कसे आहेत SBI चे कार लोन वरील व्याजदर?
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थ स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 9.20% या इंटरेस्ट रेट वर कार लोन उपलब्ध करून देते.
जर समजा एखाद्या ग्राहकाला या व्याज दारात दहा लाख रुपयांचे कर्ज पाच वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर कर्जदार व्यक्तीला 20,856 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर व्यक्तीला बारा लाख 51 हजार 360 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच पाच वर्षाच्या काळात सदर कर्जदार व्यक्तीला दोन लाख 51 हजार 360 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे येथे प्रोसेसिंग फी विचारात घेतली गेलेली नाही. यामुळे कार लोन घेण्याआधी प्रोसेसिंग फी व इतर व इतर शुल्कासंदर्भात सविस्तर विचारणा करून घेणे ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
कसे आहेत आयसीआयसीआयचे कार लोनचे व्याजदर?
आयसीआयसीआय ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 9.10% व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देत आहे.
जर समजा आयसीआयसीआय बँकेकडून किमान 9.10% इंटरेस्ट रेट वर एखाद्या ग्राहकाला पाच वर्ष कालावधीसाठी दहा लाख रुपयांचे कार लोन मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 20807 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजे सदर व्यक्तीला 12 लाख 48 हजार 420 रुपये बँकेला भरावे लागणार आहेत. अर्थातच दहा लाख रुपयांच्या कर्जासाठी दोन लाख 48 हजार 420 रुपये व्याज म्हणून अतिरिक्त द्यावे लागतील.