SBI FD Scheme : आरबीआय ने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असून यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खरे तर आरबीआयच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांनी कर्जाचे व्याजदर कमी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया सहित सर्वच प्रमुख बँकांनी होम लोन कार लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जांचे व्याजदर घटवले आहे.
त्याचवेळी आरबीआयच्या या निर्णयाचा एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सुद्धा फटका बसतोय कारण की आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर एफडी चे व्याजदर सुद्धा कमी करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडी चे व्याजदर कमी केले आहे.

मात्र आजही स्टेट बँक ऑफ इंडिया कडून एफडीवर चांगले व्याज दिले जात असून आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशा एका एफ डी योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे गुंतवणूकदारांनी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 84 हजार रुपयांची व्याज मिळणार आहे.
एसबीआयची ही एफडी योजना ठरणार फायदेशीर
आरबीआयने या वर्षात रेपो रेटमध्ये 1.25 टक्यांची कपात केली आहे. यामुळे 2025 हे वर्ष सर्वसामान्य कर्जदारांसाठी फायद्याचे ठरले आहे तरी एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तेवढेच चिंतेचे राहिले आहे.
कारण की या निर्णयानंतर देशातील जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी कर्जाचे व्याजदर आणि एफडी योजनांचे व्याजदर घटवले आहे. पण एसबीआय आजही आपल्या ग्राहकांना एफडीवर समाधानकारक व्याज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर करते.
यावर गुंतवणूकदारांना 3.05 ते 7.05% दराने व्याज दिले जाते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.05% तसेच सिनिअर सिटीजन ग्राहकांना 7.05% दराने व्याज दिले जात आहे.
याशिवाय बँकेकडून एक स्पेशल एफडी योजना सुरू करण्यात आली आहे ज्याला अमृत वृष्टी एफडी म्हणून ओळखले जाते. ही स्पेशल एफडी 444 दिवसांची आहे आणि यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.45% तसेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 6.95% दराने व्याज दिले जात आहे. दरम्यान आज आपण बँकेच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
2 लाखाच्या गुंतवणुकीवर मिळणार 84 हजार
एसबीआयच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत एखाद्या सामान्य गुंतवणूकदाराने दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला पाच वर्षांनी दोन लाख 70 हजार 35 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 70 हजार 35 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
तसेच पाच वर्षांच्या एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी दोन लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना दोन लाख 83,652 मिळणार आहेत यामध्ये 83,652 रुपये सदर सिनिअर सिटीजन ग्राहकांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. थोडक्यात सीनियर सिटीजन ग्राहकांना दोन लाखाच्या गुंतवणुकीतून 84 हजार रुपये रिटर्न मिळणार आहेत.













