SBI च्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेत 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का? मग सध्याची स्थिती पाहता तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय बेस्ट राहणार आहे. एसबीआय 36 महिन्यांच्या FD वर आपल्या ग्राहकांना चांगले व्याज देते. 

Published on -

SBI FD Scheme : फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजना हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. महिला वर्ग आणि जेष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. बँकांमध्ये एफडी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजही मिळते.

परंतु गेल्या काही दिवसांच्या काळात बँकांनी एफडीचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांकडूनही फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत.

त्यामुळे एफडी करणाऱ्यांना मोठा फटका बसतोय. मात्र अशा स्थितीत सुद्धा एसबीआय इतर काही बँकांच्या तुलनेत आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटवर चांगले व्याज देत आहे. म्हणूनच आज आपण एसबीआयच्या म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 36 महिन्यांच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे एसबीआयची 36 महिन्यांची एफडी योजना 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँका. स्टेट बँक ऑफ इंडिया मार्केट कॅपिटलनुसार म्हणजे बाजार भांडवलानुसार देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. भारतातील टॉप 10 कंपन्यांमध्ये सुद्धा एसबीआयचा नंबर लागतो.

शिवाय आरबीआयने ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक असल्याचे सांगितले आहे. म्हणूनच या बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षांची एफडी ऑफर करते.

यावर बँकेकडून 3.05% पासून ते 7.20% दराने व्याज दिले जात आहे. एसबीआय 36 महिन्यांच्या म्हणजेच तीन वर्षांच्या एफडीत गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वाधिक व्याज देते. 36 महिन्यांचा एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना बँकेकडून 6.30% दराने आणि जस्ट नागरिक ग्राहकांना 6.80% दराने व्याज दिले जात आहे.

म्हणजे सीनियर सिटीजन ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.50% अधिकचे व्याज मिळते. त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी ज्येष्ठ नागरिक असेल आणि तुम्हाला त्यांच्या नावाने एफडी करायची असेल तर एसबीआयचा पर्याय तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो.

दोन लाखांच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?

36 महिन्यांच्या एफडी योजनेत एखाद्या सामान्य ग्राहकाने दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्याला 6.30% व्याजदराने मॅच्युरिटीवर 2 लाख 41,252 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 41 हजार 252 रुपये तीन वर्षांच्या काळात व्याज म्हणून रिटर्न मिळतील.

जर सीनियर सिटीजन ग्राहकांनी 36 महिन्यांच्या एफडी योजनेत दोन लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 6.80% दराने दोन लाख 44 हजार 839 रुपये मिळणार आहेत. म्हणजे सीनियर सिटीजन ग्राहकांना तीन वर्षांच्या कालावधीत दोन लाखाच्या गुंतवणुकीतून 44,839 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!