SBI ची FD योजना बनवणार मालामाल ! 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना शॉर्ट टर्म मध्ये एफडी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे.

Published on -

SBI FD Scheme : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची आहे का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरंतर फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. फिक्स डिपॉझिट मध्ये महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवतात.

अनेकजण स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देखील गुंतवणूक करतात. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. आरबीआयने एसबीआय ला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवलंय.

त्यामुळे अनेक जण या बँकेत एफडी करण्याचा प्लॅन बनवत आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरबीआयने रेपो रेट गेल्या काही महिन्यांच्या काळात 0.50 टक्क्यांनी कमी केले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली आणि त्यानंतर या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रेपो रेट मध्ये पुन्हा 0.25 टक्क्यांची कपात झाली.

दरम्यान आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील विविध बँकांच्या माध्यमातून होम लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात सुद्धा कपात करण्यात आली.

याशिवाय बँकांकडून फिक्स डिपॉझिट च्या व्याजदरातही कपात केली जात आहे. मात्र असे असतानाही एसबीआयची फिक्स डिपॉझिट योजना ग्राहकांना चांगला परतावा देत आहे. विशेषता बँकेची एका वर्षाची एफडी योजना ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

कशी आहे एसबीआयची एका वर्षाची एफडी योजना

एसबीआय कडून आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जात आहे. यावर बँकेकडून 3.50 टक्क्यांपासून ते 7.25% पर्यंतचे व्याज दिले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून एका वर्षाच्या एफ डी वर आपल्या ग्राहकांना चांगले व्याज दिले जात आहे.

एसबीआय एका वर्षाच्या एफ डी वर सामान्य ग्राहकांना 6.50% दराने व्याज देत आहे. दुसरीकडे, या कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षावरील ग्राहकांना सात टक्के दराने व्याज देत आहे.

एक लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

जर एसबीआयच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांनी एक लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना 6.50% दराने मॅच्युरिटी वर म्हणजेच एका वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 6,660 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 6,660 रुपये या स्वरूपात रिटर्न मिळणार आहे.

तसेच जर एखाद्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकाने एसबीआयच्या एका वर्षाच्या एफडी योजनेत एका लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना सात टक्के दराने मॅच्युरिटीवर म्हणजेच 12 महिन्याचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 7185 मिळणार आहेत म्हणजेच 7185 व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News