SBI FD Scheme : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय ही देशातील सर्वाधिक मोठी सरकारी बँक आहे.
ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआय ने एसबीआयला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत समाविष्ट केले असून यामुळे एसबीआय मध्ये FD करणाऱ्यांची संख्या फारच अधिक असते.

ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध कालावधीची FD ऑफर करते. बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जात आहे.
एसबीआय आपल्या ग्राहकांना साडेतीन टक्क्यांपासून ते 7.25 % दराने व्याज देत आहे. दरम्यान आता आपण एसबीआयच्या एका वर्षाच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
एसबीआयची एका वर्षाची एफडी योजना कशी आहे?
SBI ची 365 दिवसांची म्हणजेच एका वर्षाची FD योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरते. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय कडून एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ग्राहकांना 6.50% दराने व्याज दिले जात असून याच कालावधीच्या एफडी योजनेत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांना सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
म्हणजेच सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एसबीआयची एका वर्षाची एफडी योजना अधिक परवडते. आता आपण एसबीआय मध्ये ग्राहकाने दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना किती रिटर्न मिळणार याची कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.
दोन लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?
एसबीआय एफडी कॅल्क्युलेटर नुसार जर सामान्य ग्राहकांनी याच्या एका वर्षाच्या FD योजनेत दोन लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना 2 लाख 13 हजार 320 रुपये मिळणार आहेत म्हणजेच एका वर्षात सामान्य ग्राहकांना 6.50% व्याजदरानुसार 13 हजार 320 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
जर समजा एका वर्षाच्या एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी दोन लाखाचे गुंतवणूक केली तर त्यांना सात टक्के दराने दोन लाख 14 हजार 371 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 14,371 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.