SBI FD Scheme : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक. यासोबतच ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणूनही ओळखले जाते. आरबीआय ने अलीकडेच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली असून यामध्ये एसबीआयचा पहिला नंबर लागतो.
एसबीआय नंतर एचडीएफसी जी की देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील पहिल्या क्रमांकाची बँक असून या बँकेचा नंबर लागतो आणि एचडीएफसी नंतर आयसीआयसीआय या बँकेचा नंबर लागतो आयसीआयसीआयसी बँक देशातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची प्रायव्हेट बँक आहे.

यामुळे अनेक जण या देशातील तीन प्रमुख बँकांमध्ये एफडी करतात. दरम्यान जर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एफडी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण एसबीआयच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एसबीआयच्या 444 दिवसांच्या एफडी मध्ये चार लाख 44 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर ग्राहकांना किती रिटर्न मिळणार याचेच कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेऊयात.
कशी आहे एसबीआयची 444 दिवसांची विशेष FD स्कीम?
स्टेट बँक ऑफ इंडियाची 444 दिवसांची विशेष FD स्कीम 15 एप्रिल 2025 पासून आपल्या सामान्य ग्राहकांना 7.05% दराने परतावा देत असून ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.55% दराने परतावा दिला जात आहे. म्हणजेच 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना एसबीआयच्या या स्पेशल एफडी योजनेतून अधिकचा परतावा मिळतोय.
यामुळे जर तुमच्या घरात कोणी सीनियर सिटीजन असेल आणि त्यांच्या नावाने तुम्हाला एफडी मध्ये म्हणजेच फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एसबीआयची 444 दिवसांची विशेष FD योजना अधिक फायद्याची ठरणार आहे. आता आपण या योजनेत चार लाख 44 हजाराची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार याच कॅल्क्युलेशन पाहूयात.
किती रिटर्न मिळणार?
एसबीआयच्या एफडी कॅल्क्युलेटर नुसार, एसबीआयच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकांनी चार लाख 44 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना सध्याच्या 7.05% व्याज दराने मॅच्युरिटी पिरेड नंतर चार लाख 81718 मिळणार आहेत म्हणजेच 81,718 रुपये रिटर्न म्हणून मिळतील.
तसेच जर याच एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी म्हणजेच 60 वर्षांवरील ग्राहकांनी 4 लाख 44 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना सध्याच्या 7.55% दराने मॅच्युरिटी पिरेडनंतर 484,485 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 84 हजार 485 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.