SBI च्या 400 दिवसाच्या FD योजनेत 5 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? पहा….

बँकेच्या एफडी योजना ग्राहकांना चांगला परतावा देतात. महत्त्वाचे म्हणजे देशातील काही बँक आपल्या ग्राहकांसाठी विशेष एफडी योजना सुद्धा राबवत आहेत. एसबीआय देखील आपल्या ग्राहकांसाठी अशीच एक विशेष FD योजना चालवते. या एफडी योजनेत गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Tejas B Shelar
Published:

SBI FD Scheme : सुरक्षित गुंतवणुकीसाठी आजही भारतात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याला पसंती दाखवली जाते. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे मात्र असे असले तरी आजही एफडी योजना लोकप्रिय आहेत.

एफ डी मध्ये गुंतवलेले पैसे हे सहसा बुडत नाहीत आणि यामुळेच ज्येष्ठ नागरिक तसेच महिलावर्ग एफ डी मध्ये मोठ्या प्रमाणात पैसा लावत आहे. बँकेच्या एफडी योजना ग्राहकांना चांगला परतावा देतात. महत्त्वाचे म्हणजे देशातील काही बँक आपल्या ग्राहकांसाठी विशेष एफडी योजना सुद्धा राबवत आहेत.

एसबीआय देखील आपल्या ग्राहकांसाठी अशीच एक विशेष FD योजना चालवते. या एफडी योजनेत गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. खरे तर आरबीआय ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेपो रेट मध्ये कपात केली आहे.

रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. यामुळे आगामी काळात एफडीवरील व्याज दरात कपात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एसबीआयच्या या विशेष शब्द योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

एसबीआय कडून चारशे दिवसांची अमृत कलश एफडी योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत गुंतवणूकदारांना 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. दरम्यान आता आपण एसबीआयच्या या अमृत कलश एफडी योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे एसबीआयची अमृत कलश FD योजना

एसबीआयची अमृत कलश एफडी योजना चारशे दिवसांची आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकेकडून किमान 7.10% आणि कमाल 7.60% दराने परतावा दिला जातोय. यात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.10% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना बँकेकडून 7.60% दराने परतावा मिळतोय.

पाच लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

जर समजा एखाद्या ग्राहकाने 400 दिवसांच्या अमृत कलश एफ डी योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केली तर त्याला पाच लाख 40 हजार 89 रुपये मिळणार आहेत म्हणजे 40,089 रुपये रिटर्न मिळणार आहेत.

जर सीनियर सिटीजन ग्राहकांनी याच एफडी योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच लाख 43 हजार तीन रुपये मिळणार आहेत. म्हणजे 43 हजार 3 रुपये त्यांना रिटर्न मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe