SBI FD Scheme Vs Post Office FD Scheme : तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी फारच खास ठरणार आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी एसबीआयची एफडी योजना फायद्याची ठरणार की पोस्ट ऑफिसची एफडी योजना याच बाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
खरे तर गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरल होत आहे. सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय शेअर बाजारात एक मोठा डाऊन फॉल पाहायला मिळाला आणि तेव्हापासून शेअर बाजार दबावात आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असणारे अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या संघर्ष करताना दिसत आहेत. हेच कारण आहे

की, अनेकजण शेअर बाजारापासून लांब पळताना दिसतात आणि आता गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून सुरक्षित पर्यायांचा विचार होताना दिसतोय. म्हणूनच आज आपण एसबीआयच्या एफ डी योजनेचे आणि पोस्ट ऑफिस च्या एफ डी योजनेची तुलना करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे एसबीआयची एफडी योजना?
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून आरबीआयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. आरबीआयने एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या तीन बँकांना देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या श्रेणीमध्ये ठेवलेले आहे.
हेच कारण आहे की, एसबीआय मध्ये अनेकजण एफडी करण्याच्या तयारीत आहेत. एसबीआय आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची FD योजना ऑफर करत आहे. या विविध कालावधीच्या एफडीवर बँकेकडून 3.50% पासून ते 7.25% पर्यंतचे व्याजदर दिले जात आहे.
बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सामान्य ग्राहकांना एसबीआय 1 वर्षाच्या एफडीवर 6.80 टक्के, 2 वर्षांच्या एफडीवर 7.00 टक्के, 3 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के, 4 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के आणि 5 वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज देत आहे. दुसरीकडे सीनियर सिटीजन ग्राहकांना या सर्व कालावधीच्या एफडीवर 0.50% अतिरिक्त व्याज दिले जात आहे.
पोस्टाची FD योजना किती व्याज देते?
पोस्ट ऑफिस देखील बँकांप्रमाणेच एफडी योजना ऑफर करते. पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट योजना राबवली जात असून यालाच पोस्टाची टीडी योजना किंवा एफडी योजना म्हणून ओळखतात. कारण असे की पोस्टाच्या टीडी योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनेसारखेच आहे.
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची टीडी योजना ऑफर करते. पोस्ट ऑफिसकडुबा 1 वर्षाच्या टीडीसाठी 6.9 टक्के, 2 वर्षांच्या टीडीसाठी 7.0 टक्के, 3 वर्षांच्या टीडीसाठी 7.1 टक्के आणि 5 वर्षांच्या टीडीसाठी 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे.