SBI Home Loan EMI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते तसेच कमी व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. दरम्यान, आज आपण एसबीआयच्या होम लोनची माहिती पाहणार आहोत. मंडळी आजच्या या काळात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून घर खरेदी करणे फारच आव्हानात्मक बनल आहे.
घर खरेदीसाठी लोकांना आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्च करावी लागते, आपल्या संपूर्ण आयुष्यात वाचवलेला पूर्ण पैसा गुंतवून सुद्धा अनेकांना घर खरेदी करता येत नाही. अशावेळी मग सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिक गृह कर्जाकडे वळतात आणि बँकेकडून कर्ज घेऊन घर खरेदीचे आपले स्वप्न साकार करतात.

दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल, तुम्हालाही होम लोन घ्यायचं असेल अन होम लोन घेऊन तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घरातला आकार द्यायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे.
आज आपण एसबीआय कडून 25 लाख रुपयांचे गृह कर्ज 15 वर्षांसाठी घेतले तर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार? याच एक कॅल्क्युलेशन समजून घेणार आहोत.
एसबीआयचे गृह कर्जासाठीचे व्याजदर कसे आहेत?
एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांना किमान व्याज दरात गृह कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.50% व्याजदरात गृह कर्ज देत आहे. अर्थातच हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे.
ह्या व्याजदरात फक्त अशाच ग्राहकांना होम लोन दिले जाते ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर हा चांगला असतो. 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
25 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता
जर तुम्हाला किमान 8.50% व्याजदरावर 25 लाख रुपयांचे होम लोन 15 वर्षांसाठी मंजूर झाले तर 24 हजार 618 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. आता या कॅल्क्युलेशननुसार, या कालावधीत तुम्हाला 19 लाख 31 हजार 328 रुपये व्याज द्यावे लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला बँकेला 15 वर्षांपर्यंत एकूण 44 लाख 31 हजार 328 रुपये द्यावे लागणार आहेत.