SBI Home Loan EMI : अलीकडे घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना स्वतःचे हक्काचे घर बनवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आयुष्यभर कमावलेली सर्व संपत्ती लावून सुद्धा घरासाठी पैसे उभे करता येत नाही. अशावेळी मग सर्वसामान्य नागरिक होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करतात.
दरम्यान जर तुम्हालाही होम लोन घ्यायचे असेल तर सध्याचा काळ हा सर्वोत्कृष्ट आहे. कारण की, आरबीआयने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.

आरबीआयने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआयकडून एकाच वेळी रेपो रेट मध्ये 0.50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
दरम्यान आरबीआयच्या निर्णयानंतर देशभरातील विविध बँकांच्या माध्यमातून कर्जाच्या व्याजदरात सुद्धा कपात केली जात आहे. बँकांकडून होम लोन सहित सर्वच प्रकारच्या कर्जांच्या व्याजदरात कपात केली जात आहे.
दरम्यान आता आपण एसबीआयच्या होम लोनची माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआयकडून पन्नास लाखांचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर मासिक पगार किती हवा ? याबाबतही आता आपण माहिती पाहणार आहोत.
एसबीआयचे गृह कर्जाचे व्याजदर कसे आहेत ?
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक सध्या स्थितीला आपल्या ग्राहकांना किमान 7.50% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.
मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे आणि याचा फायदा सर्वच ग्राहकांना मिळत नाही. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा ग्राहकांना एसबीआयच्या किमान व्याजदराचा फायदा मिळतो.
50 लाखांच्या गृह कर्जासाठी महिन्याचा पगार किती हवा?
मीडिया रिपोर्टनुसार, ज्या पगारदार लोकांचा महिन्याचा पगार 70 हजार रुपये इतका आहे अशा लोकांना एसबीआयकडून 50 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज मंजूर होऊ शकते. मात्र यासाठी सदर ग्राहकांच्या डोक्यावर आधीपासून कोणतेच कर्ज नसावे.
जर समजा एखाद्या ग्राहकाला 50 लाख रुपयांचे गृह कर्ज 30 वर्ष कालावधीसाठी किमान 7.50% व्याजदरात मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 35 हजार रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.