SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! 44 लाखाचे Home Loan घेतल्यास कितीचा EMI भरावा लागणार ?

अलीकडे अनेकजण Home Loan घेऊन आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही होम लोन घ्यायचे असेल तर एसबीआयचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे.

Published on -

SBI Home Loan EMI Update : प्रतिष्ठित कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीं मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. नोकरी मिळाली की मनपसंत लोकेशनवर स्वतःचं हक्काचे घर असावं असंही अनेकांच स्वप्न असतं. पण अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, त्यामुळे घर खरेदी करणे ही सोपी बाब राहिलेली नाही.

म्हणून आता घरासाठी अनेक जण होम लोन चा पर्याय स्वीकारत आहेत. दरम्यान जर तुम्हीही तुमच्या हक्काच्या घरासाठी गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.

आज आपण एसबीआय बँकेच्या गृह कर्जाची माहिती पाहणार आहोत. एसबीआय बँकेकडून 44 लाख रुपयांचे होम लोन घेतल्यास किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ? याचेही कॅल्क्युलेशन आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.

एसबीआय बँकेचे होम लोनचे व्याजदर

एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.25% पासून गृह कर्ज ऑफर करत आहे. मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर असून याचा लाभ फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळू शकतो.

किमान 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या किमान व्याजदरात होम लोन मंजूर होते. खरंतर होम लोनचे व्याजदर हे एका ठराविक कालावधीनंतर बदलत असतात. पण सध्याच्या व्याजदरानुसार आता आपण एसबीआय बँकेकडून 44 लाखांचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार हे समजून घेऊयात.

44 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 8.25 टक्के व्याजदरात 44 लाख रुपयांचे होम लोन वीस वर्ष कालावधीसाठी मंजूर झाल्यास ग्राहकांना 37,491 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

अर्थात या कालावधीत संबंधित ग्राहकाला एकूण 89 लाख 97 हजार 840 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. अर्थात ग्राहकाला या कालावधीत 45 लाख 97 हजार 840 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे.

आरबीआयच्या निर्णयानंतर एसबीआयच्या व्याजदरात कपात

रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून 7 फेब्रुवारी 2025 रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आला. आरबीआय ने पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो दरात कपात केली. आरबीआय ने रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केलेत. अर्थात रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली.

आरबीआय ने हा निर्णय घेतल्यानंतर देशातील अनेक बँकांकडून होम लोनचे व्याजदर कमी केले जात आहेत. एसबीआय ने देखील होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर एसबीआयचा पर्याय सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe