SBI देणार 60 लाखांचे होम लोन ! कितीचा हफ्ता भरावा लागणार, व्याज किती लागेल ? पहा…

SBI Home Loan : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया हे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. खाजगी आणि प्रायव्हेट बँकांचा विचार केला असता एसबीआय ही देशातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.

एसबीआय कडून ग्राहकांना परवडणाऱ्या व्याज दरात होम लोन देखील दिले जात आहे. दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या होम लोन ची माहिती पाहणार आहोत.

एसबीआय बँकेचे गृह कर्जासाठीचे व्याजदर कसे आहेत ? त्यांच्याकडून 60 लाखांच होम लोन घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार? याची आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कसे आहेत एसबीआयचे होम लोनचे व्याजदर

एसबीआय बँक 8.50% ते 9.65 टक्के वार्षिक व्याजदराने ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून देत आहे. एवढेच नाही तर एसबीआय बँकेकडून टॉप-अप होम लोन देखील उपलब्ध करून दिले जात आहे.

अनेकदा होम लोन घेतल्यानंतरही घराची कामे पूर्ण होत नाहीत, अशावेळी हा टॉप अप होम लोनचा पर्याय वापरला जातो. मात्र टॉप-अप होम लोनचे व्याजदर हे नियमित होम लोन पेक्षा अधिक असतात याची नोंद घ्यायची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय बँक टॉप-अप होम लोन ऑफर करत असून या होम लोन साठी ग्राहकांकडून 8.80% ते 11.30 टक्के दराने व्याज वसूल केले जात आहे.

60 लाखाचे होम लोन घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ?

जर समजा एखाद्या ग्राहकाला एसबीआय बँकेकडून 60 लाख रुपयांचे गृह कर्ज 8.50% व्याजदराने 30 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर सदर व्यक्तीला 46,135 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत सदर कर्जदार व्यक्तीला एक कोटी 66 लाख 8 हजार 600 रुपये भरावे लागतील.

म्हणजे एक कोटी सहा लाख 8 हजार 600 रुपये निव्वळ व्याज म्हणून बँकेला द्यावे लागणार आहेत. तीस वर्षांच्या काळात 60 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतल्यास कर्जदाराला एक लाख 8 हजार 600 रुपये व्याज द्यावे लागेल.

जर कर्जाचा कालावधी कमी असेल तर साहजिकच व्याजाची रक्कमही कमी होणार आहे. पण जर तीस वर्षांसाठी एवढा पैसा घेतला तर एक कोटीहून अधिक व्याज द्यावे लागणार आहे.