एसबीआय कडून 25 वर्षांसाठी 45 लाखांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार ? संपूर्ण कॅल्क्युलेशन पहा…

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 8.50% दराने होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर असून याचा फायदा सर्वच ग्राहकांना मिळत नाही. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर उत्तम असतो त्याच ग्राहकांना या व्याजदरावर होम लोन उपलब्ध होत असते.

Tejas B Shelar
Published:
SBI Home Loan

SBI Home Loan : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँका आहेत, पण या बारा पब्लिक सेक्टर बँकांमध्ये एसबीआय ही सर्वात मोठी बँक असून हे बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज ऑफर करते.

दरम्यान आज आपण एसबीआयच्या होम लोनची माहिती पाहणार आहोत. एसबीआय आपल्या ग्राहकांना काय व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देते? एसबीआयकडून 25 वर्षांसाठी 45 लाख रुपयांचे होम लोन घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार याबाबत आता आपण माहिती जाणून घेऊयात.

कसे आहेत SBI चे व्याजदर?

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 8.50% दराने होम लोन उपलब्ध करून देत आहे. मात्र बँकेचा हा किमान व्याजदर असून याचा फायदा सर्वच ग्राहकांना मिळत नाही.

ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर उत्तम असतो त्याच ग्राहकांना या व्याजदरावर होम लोन उपलब्ध होत असते. किमान 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या व्याजदराचा फायदा मिळतो.

म्हणजे जर तुमचाही सिबिल स्कोर 800 च्या आसपास असेल तर तुम्हाला या कीमान व्याजदराचा फायदा मिळू शकतो. मंडळी सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान असतो.

750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असणे चांगले मानले जाते. तर 700 पेक्षा कमी सिबिल स्कोर खराब समजला जातो आणि सातच्या पेक्षा कमी सिबिल स्कोर असेल तर ग्राहकांना अधिकच्या व्याजदरात कर्ज मिळते.

45 लाखांचे कर्ज घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार?

जर एसबीआयकडून एखाद्या ग्राहकाला 25 वर्ष कालावधीसाठी 45 लाख रुपयांचे कर्ज 8.50% व्याजदराने मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 36 हजार 235 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच या काळात सदर ग्राहकाला एक कोटी आठ लाख 70 हजार पाचशे रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच सदर ग्राहकाला या कालावधीत 63 लाख 70 हजार पाचशे रुपये व्याज द्यावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe