SBI Home Loan : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही पब्लिक सेक्टर मधील बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू करत असते. कमी व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या बँकेच्या माध्यमातून सातत्याने केला जातो.
एसबीआय आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटवर होम लोन, कार लोन, गोल्ड लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन अशा विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या होम लोन ची अर्थातच गृह कर्जाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर तुम्हालाही तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्ज घ्यायचे असेल आणि यासाठी तुम्ही एसबीआयचे दरवाजे ठोठावणार असाल तर बँकेची पायरी चढण्याआधी तुम्ही आजची ही बातमी पूर्ण वाचायला हवी.
कारण की आज आपण एसबीआय बँकेचे होम लोन साठीचे व्याजदर कसे आहेत? जर बँकेकडून 15 लाख रुपयांचे कर्ज 15 वर्षांसाठी घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागणार? या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
एसबीआय बँकेचे होम लोन साठीचे व्याजदर कसे आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सध्या 8.50% या व्याजदरावर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र बँकेचे हे किमान व्याजदर आहे. याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच होतोय.
ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास आहे अशा लोकांना बँकेच्या माध्यमातून या किमान व्याजदरावर गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
यामुळे जर तुमचाही सिबिल स्कोर चांगला असेल तर एसबीआय बँकेचा पर्याय हा होम लोन साठी बेस्ट ठरू शकतो. तसेच जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्ही तो सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
15 वर्षांसाठी 15 लाख रुपये घेतलेत तर कितीचा हप्ता भरावा लागणार?
समजा एसबीआय बँकेकडून तुम्हाला पंधरा वर्षे कालावधीसाठी किमान 8.50% या व्याज दरावर 15 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला 14,771 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच तुम्हाला या काळात 26 लाख 58 हजार 780 रुपये बँकेला भरावे लागणार आहेत. अर्थातच 11 लाख 58 हजार 700 रुपये व्याज म्हणून तुम्हाला बँकेत जमा करायचे आहेत.