SBI देणार 50 लाख रुपयांपर्यंतचे होम लोन ! कितीचा हप्ता भरावा लागणार ? वाचा…

जर तुम्हीही नवरात्र उत्सवाच्या काळात गृह कर्ज घेऊन गृह खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही एसबीआय बँकेकडून तुम्ही गृह कर्ज घेऊ शकणार आहात. एसबीआय बँकेकडून किमान 8.50% व्याजदरात सर्वसामान्य नागरिकांना गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र बँकेच्या या किमान व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच होऊ शकतो.

Published on -

SBI Home Loan News : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. बँकेकडून परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर होम लोन देखील उपलब्ध करून दिले जात आहे.

जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात घरासाठी गृह कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण एसबीआय बँकेच्या गृह कर्जाची माहिती पाहणार आहोत.

कसे आहे एसबीआय बँकेचे गृह कर्ज ?

खरंतर, आज घटस्थापनेचा शुभ मुहूर्त. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. घटस्थापना झाली की नवरात्र उत्सव सुरू होतो आणि विजयादशमी पर्यंत अर्थातच दसऱ्यापर्यंत हा पावन पर्व साजरा होतो. दरम्यान या शुभ मुहूर्तावर अनेक जण गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण करतात.

जर तुम्हीही नवरात्र उत्सवाच्या काळात गृह कर्ज घेऊन गृह खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही एसबीआय बँकेकडून तुम्ही गृह कर्ज घेऊ शकणार आहात. एसबीआय बँकेकडून किमान 8.50% व्याजदरात सर्वसामान्य नागरिकांना गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

मात्र बँकेच्या या किमान व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच होऊ शकतो. 800 च्या जवळपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना एसबीआय कडून गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

दरम्यान, आता आपण एसबीआय ने एखाद्या ग्राहकाला 50 लाख रुपयांचे कर्ज वीस वर्षे कालावधीसाठी मंजूर केले तर त्याला किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

50 लाखांचे गृह कर्ज घेतले तर

एखाद्या ग्राहकाला जर 50 लाख रुपयांचे गृह कर्ज वीस वर्षे कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला 43 हजार 391 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. सदर ग्राहकाला 8.50% या किमान इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज उपलब्ध झाले तर तेव्हा हा हफ्ता भरावा लागेल.

यानुसार सदर ग्राहकाला एक कोटी चार लाख 13 हजार 840 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजेच वीस वर्षाच्या कालावधी 54 लाख 13 हजार 840 रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागतील. पण ही फक्त व्याजाची रक्कम आहे यामध्ये इतर चार्जेस समाविष्ट नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News