SBI Home Loan News : अलीकडे घर घेणे काही सोपी बाब राहिलेली नाही. घरांच्या वाढलेल्या किमती पाहता घर खरेदीसाठी आयुष्यात जमा केलेला सर्वा पैसा ओतावा लागतोय. तरीही अनेकांना घर खरेदी करणे शक्य होत नाही. आवडत्या शहरात आणि मनपसंत लोकेशनवर घर खरेदीसाठी लाखो-करोडो रुपयांचा खर्च करावा लागतो. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घर खरेदीचा निर्णय घेतात.
होम लोनचा विषय निघाला की एसबीआयचे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देते.

दरम्यान आज आपण एसबीआयच्या होम लोन ची माहिती पाहणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून 80 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षांसाठी घेतल्यास कर्जदाराला दरमहा कितीचा हप्ता भरावा लागेल? याबाबत अनेकांकडून प्रश्न विचारले जात होते आणि आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे व्याजदर
आरबीआय ने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये एसबीआय चा सुद्धा समावेश होता. देशात एकूण 12 पीएसबी आहेत म्हणजेच सरकारी बँकां आहेत. या 12 पैकी एसबीआय ही आरबीआयच्या सुरक्षित बँकांच्या यादीत येते.
यामुळेयामुळे अनेक जण एसबीआय मध्ये एफ डी करतात आणि एसबीआय कडूनच कर्ज घेण्याला प्राधान्य दाखवले जाते. एसबीआय कडून सुद्धा आपल्या ग्राहकांना परवडेल अशा व्याजदरातच कर्ज दिले जात आहे. SBI गृहकर्जाबाबत बोलायचे झाल्यास याचा किमान व्याजदर 8.25% वार्षिक असा आहे.
मात्र हा बँकेचा किमान व्याजदर आहे. ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांना या व्याजदराचा लाभ मिळू शकतो. पण जर या व्याजदरावर 80 लाखांचे कर्ज 20 वर्षांसाठी मंजूर झाले तर मासिक EMI (हप्ता) अंदाजे 68,165 रुपये इतका भरावा लागणार आहे.
हा हप्ता व्याजदरावर अवलंबून असून व्याजदरात कमी जास्त झाले की बदलू शकतो. जर व्याजदर वाढला, तर EMI वाढेल आणि व्याजदर कमी झाल्यास EMI कमी होईल. दरम्यान जर हाच व्याजदर कर्ज परतफेड होईपर्यंत कायम राहिला तर संबंधित ग्राहकाला वीस वर्षांच्या काळात 83 लाख 59 हजार 661 रुपये इतके व्याज द्यावे लागणार आहे.
म्हणजेच मुद्दल रक्कम 80 लाख रुपयांची आणि यावरील व्याज असे एकूण एक कोटी 63 लाख 59 हजार 661 रुपये संबंधित ग्राहकाला बँकेला द्यावे लागणार आहेत. पण यामध्ये प्रोसेसिंग फीचा कोणताच समावेश नाहीये.
म्हणून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यापूर्वी बँकेकडून अचूक हिशोब करून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान जर तुम्ही गृहकर्ज घेत असाल तर होम लोन घेण्यापूर्वी प्रत्येकाने आपली आर्थिक स्थिती तपासून योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.