SBI ची ग्राहकांना मोठी भेट! होम लोनवरील व्याजदरात कपात, आता 50 लाखांचे कर्ज घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ?

आरबीआयच्या निर्णयानंतर देशातील अनेक प्रमुख बँकांनी आपले होम लोन वरील व्याजदर कमी केलेत. त्यानंतर आता भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच SBI ने आपल्या बाह्य बेंचमार्क-आधारित कर्ज दर (EBLR) आणि रेपो लिंक्ड कर्ज दर (RLLR) यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

Published on -

SBI Home Loan : SBI अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्जधारकांसाठी मोठी घोषणा केली असून गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर SBI ने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. यामुळे आता SBI मधून गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मासिक EMI कमी द्यावा लागणार आहे.

रेपो दर कपात आणि SBI चा मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेने आपल्या अलिकडील पतधोरण समिती (MPC) बैठकीत रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआय ने 7 फेब्रुवारी 2025 रोजी रेपो रेटमध्ये 0.25% कपात करत तो 6.50% वरून 6.25% केला.

आरबीआयच्या निर्णयानंतर देशातील अनेक प्रमुख बँकांनी आपले होम लोन वरील व्याजदर कमी केलेत. त्यानंतर आता भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच SBI ने आपल्या बाह्य बेंचमार्क-आधारित कर्ज दर (EBLR) आणि रेपो लिंक्ड कर्ज दर (RLLR) यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

महत्त्वाची बाब म्हणजे बँकेने घेतलेले हे नवीन निर्णय दोन दिवसांपासूनच लागू झालेले आहेत. नवीन व्याजदर 15 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आले आहेत. मात्र, MCLR आणि BPLR दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

नवीन व्याजदर कसा असेल?

आधी SBI चा EBLR (External Benchmark Lending Rate) 9.15% + CRP + BSP इतका होता, जो आता 8.90% + CRP + BSP करण्यात आला आहे. त्यामुळे SBI मधून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा अन्य किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

50 लाखांच्या कर्जावर EMI किती कमी होणार?

जर तुम्ही SBI मधून 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल आणि त्याचा कालावधी 20 वर्षे असेल, तर आधी तुम्हाला 9.15% व्याजदराने 45,470 रुपये EMI भरावा लागत होता. मात्र, व्याजदर 8.90% झाल्यामुळे आता तुम्हाला केवळ 44,665 रुपये EMI द्यावा लागेल. यामुळे ग्राहकांचा मासिक EMI 805 रुपयांनी कमी होणार आहे, ज्याचा दीर्घकालीन फायदा मोठ्या प्रमाणावर जाणवेल.

SBI च्या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदा

SBI च्या या निर्णयामुळे हजारो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नव्या ग्राहकांसाठीही ही संधी सोनेरी ठरणार आहे. व्याजदर कपातीमुळे EMI मध्ये घट झाल्याने लोकांच्या आर्थिक नियोजनाला मदत होईल.

गृहकर्ज घेण्याची योग्य संधी

अशा स्थितीत जे ग्राहक नवीन घर घेण्याचा विचार करत आहेत किंवा गृहकर्ज घेऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. SBI चे नवीन कमी व्याजदर आणि EMI कपात ही घर खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम संधी ठरणार आहे. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी नवीन व्याजदरांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe