SBI Home Loan : SBI अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये 0.25% (25 बेसिस पॉईंट) कपात केली आहे. यामुळे होम लोन, पर्सनल लोन आणि इतर किरकोळ कर्जांवरील व्याजदर कमी होणार असून ग्राहकांना EMI मध्ये दिलासा मिळणार आहे.
हे नवीन व्याजदर काल, 15 फेब्रुवारी 2025 पासून लागू असतील. अर्थातच एसबीआय कडून होम लोन घेणे आता फायद्याचे होणार आहे. होम लोन वरील व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच याचा मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त होते.

रेपो रेट कपातीनंतर SBI चा मोठा निर्णय
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सात फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षांनी पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये आरबीआय कडून कपात करण्यात आली. यावेळी आरबीआयने रेपो रेट मध्ये 0.25% कपात केली.
आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली असल्याने आता विविध प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी होणार आहे. यानुसार आत्तापर्यंत देशातील अनेक बँकांनी आपल्या विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात कपात केलेली आहे. त्यानंतर, आता SBI ने आपल्या रेपो लिंक्ड कर्जांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा बँकेच्या लाखो ग्राहकांना फायदा होणार आहे.
SBI ने EBLR 9.15% वरून 8.90% आणि RLLR 8.75% वरून 8.50% करण्याची घोषणा केली आहे. मात्र, मार्जिनल कॉस्ट-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR), बेस रेट आणि बेंचमार्क प्राइम लेंडिंग रेट (BPLR) मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच या निर्णयाचा बँकेच्या सर्वच ग्राहकांना फायदा होणार नाहीये. म्हणून आता आपण या निर्णयाचा बँकेच्या कोणत्या ग्राहकांना फायदा होईल याचीच माहिती पाहूयात.
EMI कसा होणार कमी?
या व्याजदर कपातीचा फायदा फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतलेल्या ग्राहकांना होईल. नवीन व्याजदर लागू झाल्यानंतर EMI मध्ये कपात होईल किंवा लोनची मुदत कमी करता येईल.
कोणते ग्राहक होणार लाभार्थी?
फ्लोटिंग रेटवर लोन असलेल्या ग्राहकांच्या EMI मध्ये कपात होईल. नवीन ग्राहकांना होम लोन स्वस्तात मिळणार आहे. मात्र MCLR आधारित लोन असलेल्या ग्राहकांना याचा फायदा होणार नाही. MCLR वर असलेले ग्राहक इच्छित असल्यास आपले लोन EBLR किंवा RLLR वर ट्रान्सफर करण्याचा पर्याय निवडू शकतात.
नवीन ग्राहकांसाठी सुवर्णसंधी !
सध्याच्या व्याजदर कपातीनंतर, SBI चे होम लोन इतर बँकांच्या तुलनेत अधिक आकर्षक ठरू शकते. नवीन ग्राहकांना कमी व्याजदरावर लोन घेण्याची संधी आहे, तर जुने ग्राहक आपली EMI कमी करण्यासाठी पुनर्वित्त (Refinancing) करण्याचा विचार करू शकतात.
ग्राहकांनी काय करावे?
नवीन ग्राहकांनी SBI च्या व्याजदरांची तुलना करून होम लोनचा निर्णय घ्यावा. सध्याचे ग्राहक EMI रीकॅल्क्युलेट करून लोन टेन्युअर कमी करण्याचा विचार करू शकतात. MCLR आधारित ग्राहकांना हवे असल्यास EBLR किंवा RLLR वर शिफ्ट होण्याचा पर्याय निवडता येईल. ही व्याजदर कपात गृहकर्जदारांसाठी मोठी संधी ठरू शकते. पण, ग्राहकांनी आपल्या कर्जाच्या अटी व पर्यायांची काळजीपूर्वक तुलना करून निर्णय घ्यावा.