SBI Mutual Fund Scheme : आपल्यापैकी अनेकजण स्वतःच्या कमाईचा काही हिस्सा कुठे ना कुठे गुंतवत असतात. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेकजण पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. तर अलीकडे काही लोक अधिकचा परतावा मिळत असल्याने म्युच्युअल फंडात देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे दिसते.
दरम्यान जर तुम्ही सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एसबीआयने एक खास योजना आणली आहे. एसबीआयच्या योजनेमधून गुंतवणूकदारांना कमीत कमी गुंतवणुकीतून एक मोठा फंड तयार करता येणार आहे.

एसबीआयने जन निवेश योजना नावाची एक नवीन एसआयपी योजना सुरू केली असून यामध्ये गुंतवणूकदारांना किमान 250 रुपयांपासून एसआयपी करता येणार आहे. यामुळे जर तुम्हालाही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही SIP योजना फायद्याची ठरणार आहे.
या योजनेत दरमहा 250 रुपयांची एसआयपी करूनही गुंतवणूकदारांना 78 लाख रुपयांपर्यंतचा फंड जमा करता येणार आहे. म्हणून आज आपण या योजनेचे संपूर्ण कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे मिळणार 78 लाख?
एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरासरी 12 ते 15 टक्के दराने परतावा मिळतोय. जर एसबीआयच्या या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आणि गुंतवणूकदारांना वार्षिक 15 टक्के दराने परतावा मिळाला तर तीस वर्षानंतर आणि 40 वर्षानंतर गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याचा एक आता आपण आढावा घेऊयात.
एखाद्या गुंतवणूकदाराने जर यात दरमहा 250 रुपयांची एसआयपी केली आणि त्या गुंतवणूकदाराला वार्षिक 15 टक्के दराने परतावा मिळाला तर 30 वर्षांनी संबंधित गुंतवणूकदाराला 17.30 लाख रुपये मिळणार आहेत.
यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही फक्त 90 हजार रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित 16 लाख 62 हजार 455 गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने धर्म अडीचशे रुपयांची एसआयपी केली आणि त्या गुंतवणूकदाराला वार्षिक 15 टक्के दराने परतावा मिळाला तर 40 वर्षांनी संबंधित गुंतवणूकदाराला 78 लाख रुपयांपेक्षा अधिकचा परतावा मिळणार आहे.
चाळीस वर्षांनी अडीचशे रुपये एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदाराला 78 लाख 50,939 रुपये मिळणार आहेत यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 1 लाख 20 हजार रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित 77 लाख 30 हजार 939 रुपये त्या गुंतवणूकदाराला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.