एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! RBI च्या निर्णयानंतर ग्राहकांना दिला मोठा झटका

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने अर्थातच एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिलाय. एसबीआयकडून आपल्या एफडी व्याजदरात कपात करण्यात आली आहे. काही ठराविक कालावधीच्या एफडी योजनेचे व्याजदर बँकेकडून कमी करण्यात आले आहेत.

Published on -

SBI News : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेचे करोडो कस्टमर आहेत. दरम्यान एसबीआयच्या ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

एसबीआय ने आपल्या ग्राहकांना नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच मोठा दणका दिला आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली.

आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केलेत. याआधी सुद्धा आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केले होते. म्हणजेच गेल्या काही महिन्यांमध्ये रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.

आरबीआयच्या या निर्णयानंतर देशभरातील बँकांकडून होम लोन च्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. होम लोन सहित सर्वच प्रकारचे कर्ज आता स्वस्त झाले आहेत. दुसरीकडे आरबीआयच्या निर्णयानंतर आता एफडीच्या व्याजदरात सुद्धा कपात करण्यात आली आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसतोय.

स्टेट बँक ऑफ इंडिया ने देखील आपल्या एफ डी व्याज दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. अशा परिस्थितीत आज आपण एसबीआय ने कोणत्या कालावधीच्या एफडी योजनांमध्ये कपात केली आहे याचा एक आढावा घेणार आहोत.

या एफडी योजनांचे व्याजदर कमी झालेत

मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयच्या रेपो रेट मध्ये कपातीच्या निर्णयानंतर देशातील सर्वात मोठ्या सहकारी बँकेकडून अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

यासोबतच, बँकेने त्यांची अमृत वृष्टी योजना पुन्हा सुरू केली आहे परंतु या विशेष एफडी योजनेचे व्याजदर देखील कमी करण्यात आले आहेत. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एफडी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

आता आपण एसबीआयने एक ते तीन वर्ष कालावधीच्या एफडी योजनेचे व्याजदर किती कमी केले आहेत आणि अमृत वृष्टी योजनेचे व्याजदर किती कमी झाले आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

एक ते तीन वर्ष कालावधीच्या एफडी योजनेचे व्याजदर किती कमी झालेत?

एसबीआय कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बँकेने एक ते तीन वर्ष कालावधीच्या एफडी व्याजदरात 10 बेसिस पॉईंट अर्थातच 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही कपात सामान्य ग्राहकांना तसेच ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सुद्धा लागू राहणार आहे.

आधी एक ते दोन वर्ष कालावधीच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.80% दराने रिटर्न दिले जात होते मात्र आता हे व्याजदर 6.70 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

तसेच दोन ते तीन वर्ष कालावधीच्या एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आधी सात टक्के दराने रिटर्न दिले जात होते. मात्र आता हे व्याजदर 6.90% पर्यंत कमी करण्यात आले आहेत. 

अमृत वृष्टी योजनेच्या व्याजदरात सुद्धा कपात 

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 31 मार्च 2025 रोजी अमृत वृष्टी योजना बंद करण्यात आली. ही बँकेची एक विशेष FD योजना होती. या एफ डी योजनेचा कालावधी 444 दिवस एवढा होता. मात्र आता ही 444 दिवसांची विशेष स्कीम पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

मात्र यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळणार आहे. आधी या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के दराने आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75 टक्के दराने रिटर्न दिले जात होते.

मात्र नवीन निर्णयानुसार या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांना 7.05% दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55% दराने रिटर्न मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe