SBI की एचडीएफसी, कोणत्या बँकेचे पर्सनल लोन परवडणार ? वाचा सविस्तर

तुम्हालाही एखाद्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना एसबीआय किंवा एचडीएफसी कडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे.

Published on -

SBI Vs HDFC Personal Loan : आपल्यालाही कधी ना कधी पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. इमर्जन्सीमध्ये बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे हा एक फायद्याचा पर्याय ठरतो. अनेकजण एसबीआय तसेच एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घेतात.

पण एसबीआय आणि एचडीएफसी यापैकी कोणती बँक परवडणाऱ्या व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून देते? याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत. खरंतर वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांपेक्षा थोडेसे अधिक असतात. यामुळे जेव्हा फारच इमर्जन्सी असेल तेव्हाच पर्सनल लोन घेण्याचा विचार करावा अन्यथा इतर मार्गांनी पैशांची व्यवस्था करावी. तसेच ज्या बँका कमी व्याजदरात पर्सनल लोन देतात त्यांच्याकडूनच पर्सनल लोन घेण्याचा विचार करायला हवा.

एसबीआय की एचडीएफसी कोणत्या बँकेचे पर्सनल लोन परवडते?

स्टेट बँक ऑफ इंडिया चे पर्सनल लोन : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात विविध प्रकारच्या कर्जाची उपलब्धता करून देते. सध्या स्थितीला एसबीआय किमान 10.30% व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे.

मात्र बँकेच्या या किमान व्याजदराचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिव्हिल स्कोर 800 च्या आसपास आहे अशाच लोकांना मिळतो. जर समजा बँकेच्या या किमान व्याजदरात दहा लाख रुपयांचे पर्सनल लोन पाच वर्षांसाठी मंजूर झाले तर संबंधित ग्राहकाला 21 हजार 395 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच सदर ग्राहकाला 12 लाख 83 हजार 700 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच दोन लाख 83 हजार 700 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.

एचडीएफसी बँकेचे पर्सनल लोन : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठे प्रायव्हेट बँक म्हणून ओळखली जाते. एसबीआय प्रमाणेच ही सुद्धा बँक आपल्या ग्राहकांना किमान व्याजदरात होम लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, पर्सनल लोन सारखे कर्ज उपलब्ध करून देते. या बँकेच्या वैयक्तिक कर्जाबाबत बोलायचं झालं तर एचडीएफसी आपल्या ग्राहकांना किमान 10.90% व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे.

मात्र या व्याजदराचा फायदा सर्वच ग्राहकांना मिळत नाही. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच या व्याजदराचा फायदा मिळतो. 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या बँकेकडून किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. जर समजा बँकेच्या या किमान व्याजदरात दहा लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षांसाठी मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 21,693 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजे सदर ग्राहकाला 13 लाख 1580 रुपये भरावे लागतील. म्हणजेच तीन लाख 1 हजार 580 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe