SBI Personal Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याज दरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात असून आज आपण एसबीआयच्या वैयक्तिक कर्जाची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरंतर, इतर कर्जांच्या तुलनेत वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे नेहमीच अधिक असतात. यामुळे वैयक्तिक कर्ज घेताना विविध बँकांच्या वैयक्तिक कर्ज व्याजदराची तुलना करणे आवश्यक असते.

दरम्यान जर तुम्हाला फारच आवश्यकता असेल आणि वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एसबीआयचे वैयक्तिक कर्ज फायद्याचे ठरणार आहे.
कारण की एसबीआय इतर बँकांच्या तुलनेत कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. यामुळे तुमच्यासाठी एसबीआयचे वैयक्तिक कर्ज फायद्याचे ठरू शकते.
एसबीआयचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर
How much monthly installment will you have to pay if you take a personal loan of 7 lakhs from SBI? Read… आपल्या ग्राहकांना सध्या 10.30% दराने वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. इतर बँकांसोबत तुलना केली असता एसबीआयचे हे व्याजदर ग्राहकांसाठी किफायतशीर आहेत.
पण एसबीआयकडून या व्याजदराचा फायदा फक्त अशाच ग्राहकांना दिला जातोय ज्यांचा सिबिल स्कोर हा 800 किंवा 800 चा आसपास असते. आता आपण SBI कडून 7 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास किती रुपये व्याज भरावे लागणार याची माहिती जाणून घेणार आहोत.
7 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास किती EMI भरावा लागेल ?
जर समजा एखाद्या बँकेने 3 वर्षांसाठी 7 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतल्यास अन हे कर्ज 10.30 % व्याजदरात मंजूर झाल्यास त्या व्यक्तीला 22 हजार 686 रुपयांचा हफ्ता भरावा लागणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीला 8 लाख 16 हजार 696 रुपये भरावे लागतील.
अर्थात सदर व्यक्तीला 1 लाख 16 हजार 696 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे. नक्कीच पर्सनल लोन हे इतर कर्जापेक्षा अधिक महाग पडणार आहे. यामुळे कर्ज घेताना जी बँक स्वस्तात कर्ज देते त्या बँकेकडूनच कर्ज घ्यावे अन प्रोसेसिंग फि सुद्धा चेक करावी.