SBI Personal Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज कमीत कमी व्याजदरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असतो. एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना होम लोन पर्सनल लोन गोल्ड लोन बिझनेस लोन एज्युकेशन लोन अशा विविध प्रकारचे कर्ज देत असते.
दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या पर्सनल लोन बाबत माहिती पाहणार आहोत. बँकेचे पर्सनल लोनसाठीचे व्याजदर, 8 लाखांचे पर्सनल लोन घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार? याबाबत आता आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआयचे पर्सनल लोन साठीचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या आपल्या ग्राहकांना किमान 11.45 टक्के दराने पर्सनल लोन उपलब्ध करून देत आहे. तसेच ही बँक ग्राहकांना कमाल पाच वर्षांसाठी पर्सनल लोन देते. म्हणजेच ग्राहकांना 60 महिन्यांसाठी पर्सनल लोन मिळू शकते.
मात्र हा एसबीआय बँकेचा किमान व्याजदर आहे. या व्याजदराचा फायदा फक्त आणि फक्त अशाच ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचा सिबिल स्कोर हा चांगला असतो. 750 किंवा त्यापेक्षा अधिक सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या व्याजदरात बँकेकडून पर्सनल लोन उपलब्ध करून दिले जाते.
इतर बँकांच्या तुलनेत एसबीआयचा हा रेट फारच कमी आहे. मात्र असे असले तरी इतर कर्जांच्या तुलनेत पर्सनल लोनचा व्याजदर हा नेहमीच अधिक असतो यामुळे जोपर्यंत जास्त इमर्जन्सी नसते तोपर्यंत पर्सनल लोन घेऊ नये असा सल्ला दिला जातो.
8 लाखांचे कर्ज घेतल्यास किती रुपयांचा हप्ता
आता आपण एसबीआय कडून जर एखाद्या ग्राहकाला आठ लाख रुपयांचे पर्सनल लोन मंजूर झाले तर त्याला किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याबाबतचे कॅल्क्युलेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर समजा एसबीआय कडून एखाद्या ग्राहकाला किमान 11.45% व्याजदरात आठ लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षांसाठी म्हणजेच 60 महिन्यांसाठी मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 17,574 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या काळात संबंधित ग्राहकाला दहा लाख 54 हजार 440 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. म्हणजे मुद्दल आठ लाख रुपये वजा केली असता संबंधित ग्राहकाला 2 लाख 54,440 रुपयांचे व्याज द्यावे लागणार आहे.