कोणतीही परीक्षा न देता थेट नोकरीची संधी ! SBI मध्ये निघाली भरती, पगार तब्बल 45 हजार रुपये, अर्ज कुठं करणार ? पहा….

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक भरती निघाली आहे ज्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान एसबीआयने या पदभरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून गेल्या काही दिवसांपासून अर्ज मागवले जात आहेत.

Published on -

SBI Recruitment March 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? अहो मग आजची बातमी खास तुमच्यासाठी. विशेषता ज्यांना बँकेत नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक भरती निघाली आहे ज्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे या पद भरती अंतर्गत कोणतीही परीक्षा न देता थेट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे जर तुम्हीही बँकेच्या नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे. दरम्यान एसबीआयने या पदभरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून गेल्या काही दिवसांपासून अर्ज मागवले जात आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या अंतर्गत कोणत्या पदांसाठी, किती जागांसाठी भरती होणार? आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, निवड झालेल्या उमेदवाराला किती पगार मिळणार? या साऱ्या मुद्द्यांचा आज आपण आढावा घेणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

जाहिरातीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये FLC काउंसलर आणि FLC डायरेक्टर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

FLC काउंसलर आणि FLC डायरेक्टर या पदाच्या 269 रिक्त जागा या पदभरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

निवड कशी होणार?

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. अर्थात या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही. म्हणजे पेपर न देता उमेदवारांना नोकरी मिळवता येणे शक्य होणार आहे.

पगार किती मिळणार?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, क्लरिकल पदासाठी 30 हजार रुपये पगार मिळणार आहे. जेएमजीएस I पदासाठी 40 हजार रुपये पगार मिळणार आहे. एमएमजीएस II या पदासाठी 45 हजार रुपये पगार मिळणार आहे. एमएमजीएस III पदासाठी सुद्धा 45 हजार रुपये पगार मिळणार आहे. तर एमएमजीएस IV पदासाठी 50 हजार रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज कुठं करणार?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करायचा आहे. मुदतीनंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याही सबबीवर विचार केला जाणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe