SBI Special FD Scheme : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन स्पेशल एफ डी स्कीम घेऊन आली आहे. ज्या गुंतवणूकदारांना अवघ्या काही वर्षाच्या काळातच आपले पैसे दुप्पट करायचे असतील त्यांच्यासाठी एसबीआयची ही विशेष FD स्कीम फायद्याची ठरणार आहे. या एफ डी स्कीम मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार काही दिवसातच दुप्पट रिटर्न मिळवू शकतील.
मंडळी अनेक जण आपल्याकडील पैसा दुपटीने वाढावा यासाठी विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. ज्या लोकांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी गुंतवणूक करायचे नसते ते लोक बचत योजनांमध्ये पैसा गुंतवतात.
अनेकजण पोस्टाच्या बचत योजनांमध्ये आणि पीपीएफ सारख्या बचत योजनांमध्ये आपले पैसे गुंतवत आहेत. अनेकांना असे वाटते की या बचत योजना एफडी योजनांपेक्षा अधिकचा परतावा देतात. प्रत्यक्षात मात्र एसबीआयची एफडी योजना इतर बचत योजनांच्या तुलनेत अधिकचा परतावा देत आहे.
एसबीआयच्या विशेष एफडी योजनेतून फक्त 75 महिन्यांच्या कालावधीतच गुंतवणूकदारांना चांगली कामही होताना दिसत आहे. आज आपण एसबीआयच्या 2222 दिवसांच्या विशेष FD ची माहिती पाहणार आहोत.
कशी आहे एसबीआयची 2222 दिवसांची विशेष एफ डी योजना ?
एसबीआय कडून एसबीआय ग्रीन रुपया फिक्स डिपॉझिट नावाची विशेष एफडी स्कीम राबवली जात आहे. या योजनेत ग्राहकांना 2222 दिवसांसाठी गुंतवणूक करता येते. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर बँकेकडून आकर्षक व्याजदर ऑफर केले जात आहेत.
पण ही एक स्पेशल एफडी स्कीम असून यामध्ये लिमिटेड टाइमिंग साठीच गुंतवणूक करता येणार आहे. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत जर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायचे असेल तर त्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
यामध्ये गुंतवणुकीची शेवटची दिनांक 31 मार्च 2025 आहे त्यानंतर या योजनेतील गुंतवणूक थांबवली जाईल असे म्हटले जात आहे. या योजनेत जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. तीन कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम यामध्ये गुंतवता येत नाही. या एफ डी स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.40% दराने परतावा दिला जातोय.
मात्र सीनियर सिटीजन ग्राहकांना यामधून अधिकचा परतावा मिळतोय. या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.40% दराने परतावा दिला जातोय. आता आपण या योजनेत दहा लाख 50 हजाराची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणार याबाबत माहिती पाहूयात.
किती रिटर्न मिळणार?
पोस्टाच्या 2222 दिवसांच्या विशेष एफ डी योजनेत एखाद्या ग्राहकाने 10 लाख 50 हजाराची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच 2222 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 6.40% दराने 15 लाख 23 हजार 488 रुपये रिटर्न मिळणार आहेत. अर्थातच चार लाख 73 हजार 488 रुपये हे व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
दुसरीकडे याच एफडी योजनेत सिनिअर सिटीजन ग्राहकाने दहा लाख 50 हजाराची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर 7.40% दराने 16 लाख 11 हजार 442 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 5 लाख 61,442 रुपये हे सीनियर सिटीजन ग्राहकांना व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.