SBI Vs HDFC Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी गृह कर्ज घ्यायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढलेले आहेत आणि यामुळे अनेक जणांना नाईलाज म्हणून भाड्याच्या घरात राहावे लागते.
आजच्या या महागाईच्या काळात सामान्य माणसाला स्वतःचे घर खरेदी करणे फारच अवघड आहे. घरांच्या किमती एवढ्या प्रचंड वाढल्या आहेत की संपूर्ण आयुष्यात जमवलेली जमापुंजी खर्च करून सुद्धा देखील घराचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य आहे.

यामुळे अनेकजण स्वतःच्या घराच्या निर्मितीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारतात. देशातील अनेक बँका सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. एसबीआय आणि एचडीएफसी या बँका देखील आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन पुरवत आहेत.
दरम्यान, आज आपण एसबीआय आणि एचडीएफसी या दोन्ही बँकांच्या गृह कर्जाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि या दोन्ही बँकांपैकी कोणत्या बँकेचे होम लोन परवडणारें आहे याचा सविस्तर आढावा सुद्धा घेणार आहोत.
HDFC चे व्याजदर कसे आहेत?
एचडीएफसी बँक बाबत बोलायचं झालं तर ही देशातील पहिल्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.45 टक्के व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. पण एचडीएफसी बँकेचे हे व्याजदर सुरुवातीचे आहेत याचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच मिळतो.
साधारणता ज्या लोकांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असतो अशा लोकांना याचा फायदा होतो. समजा जर एखाद्या ग्राहकाला एचडीएफसी बँकेकडून किमान 8.45% व्याजदरात 25 लाखांचे गृह कर्ज वीस वर्षांसाठी मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 21,617 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच सदर ग्राहकाला संपूर्ण कर्ज कालावधीमध्ये 51 लाख 88 हजार 80 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच 26 लाख 88 हजार 80 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील.
SBI चे Home Loan कसे आहे ?
एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून देते. या बँकेच्या होम लोन च्या व्याजदराबाबत बोलायचं झालं तर ही बँक आपल्या ग्राहकांना किमान आठ टक्के व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे.
मात्र बँकेचे हे व्याजदर ग्राहकाच्या सिबिल स्कोर नुसार बदलतात. ज्या लोकांचा सिबिल स्कोर आठशेच्या आसपास असतो अशा लोकांना बँकेकडून किमान 8% व्याजदरात गृह कर्ज मिळू शकते.
समजा एसबीआयकडून एखाद्या ग्राहकाला वीस वर्ष कालावधीसाठी 25 लाखांचे गृह कर्ज आठ टक्के व्याज दरात मंजूर झाले तर अशा ग्राहकाला 20 हजार 911 रूपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच वीस वर्षांच्या काळात सदर ग्राहकाला 50 लाख 18 हजार 640 रुपये भरावे लागणार आहे, यात 25 लाख 18 हजार 640 रुपये व्याजाची रक्कम राहणार आहे.