SBI Vs HDFC Personal Loan : आपल्याला पैशांची अचानक गरज भासली की आपण सर्वप्रथम बँकेत धाव घेत असतो. बँकेतून इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये पर्सनल लोन सहज उपलब्ध होते. दरम्यान जर तुम्हाला ही वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.
कारण की आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या दोन प्रमुख बँकांच्या वैयक्तिक कर्जाच्या व्याजदराची तुलना करणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अन एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक.

या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या पर्सनल लोनसाठी अर्थातच वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर वेगवेगळे असतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि HDFC बँक या दोन मोठ्या बँका ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देतात.
8 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास आणि ते 5 वर्षांत परतफेड करण्याचा विचार केल्यास कोणत्या बँकेचा ईएमआय (EMI) अधिक किफायतशीर ठरतो, हे पाहूयात.
सध्या SBI चा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 11.50% पासून सुरू होतो, तर HDFC बँकेचा व्याजदर 10.75% पासून सुरू होतो. हे व्याजदर अर्जदाराच्या क्रेडिट स्कोर, उत्पन्न आणि बँकेच्या धोरणांनुसार वेगळे असू शकतात.
5 वर्षांसाठी 8 लाख रुपयांचे घेतले तर किती EMI भरावा लागणार ?
SBI सध्या आपल्या ग्राहकांना सरासरी 11.50% व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. जर समजा एसबीआयकडून याच व्याज दरात पाच वर्षांसाठी आठ लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले तर संबंधित ग्राहकाला 17,609 रुपये प्रति महिना इतकां हफ्ता भरावा लागणार आहे.
HDFC ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 10.75% व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे. जर समजा एचडीएफसी कडून याच व्याजदरात एखाद्या कस्टमरला आठ लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज पाच वर्षांसाठी मंजूर झाले तर 17,338 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते की HDFC बँकेच्या तुलनेत SBI चा ईएमआय थोडा जास्त येतो, कारण त्याचा व्याजदर अधिक आहे. मात्र, कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकांनी सर्व अटी, प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्कांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
तसेच, क्रेडिट स्कोर चांगला असल्यास बँक कमी व्याजदराची ऑफर देऊ शकते, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी बँकेशी संपर्क करून संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.