SBI Vs HDFC Vs BoB Home Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात होम लोन घेण्याच्या तयारीत आहात का ? अहो, मग आजची ही बातमी खास तुमच्यासाठी. खरंतर, अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत.
दरम्यान जर तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घरासाठी होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआय एचडीएफसी आणि बँक ऑफ बडोदा या तिन्ही बँकांच्या होम लोन ची तुलना करणार आहोत.

कोणत्या बँकेचे होम लोन ठरणार फायदेशीर
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 8.25 टक्के व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. अशा परिस्थितीत जर एसबीआय कडून 30 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षांसाठी 8.25 टक्के इंटरेस्ट रेट वर घेतले तर 25 हजार 562 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
मात्र बँकेच्या या किमान इंटरेस्ट रेट वर जर होम लोन मिळवायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असणे आवश्यक आहे.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना किमान 8.15 टक्के व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. अशा परिस्थितीत जर BoB कडून 30 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षांसाठी 8.15 टक्के इंटरेस्ट रेट वर घेतले तर 25 हजार 374 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
मात्र बँकेच्या या किमान इंटरेस्ट रेट वर जर होम लोन मिळवायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असणे आवश्यक आहे.
HDFC Bank : HDFC आपल्या ग्राहकांना किमान 8.70 टक्के व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. अशा परिस्थितीत जर HDFC कडून कडून 30 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षांसाठी 8.70 टक्के इंटरेस्ट रेट वर घेतले तर 26 हजार 416 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
मात्र बँकेच्या या किमान इंटरेस्ट रेट वर जर होम लोन मिळवायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा : हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण! आता डझनभर आंबे मिळणार फक्त इतक्या रुपयांत!
अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी जॉईन करा आमचा Whatsapp ग्रुप