School Holiday : नोव्हेंबर महिना संपण्यासाठी आता फक्त पाच सहा दिवसांचा काळ बाकी आहे. एकीकडे नोव्हेंबर महिना आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे तर दुसरीकडे आरबीआय ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर डिसेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
आरबीआय सोबतच आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांबाबतही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर डिसेंबर महिना हा या वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि म्हणूनच या महिन्यात अनेकांनी आपले वेगवेगळे प्लॅन तयार केलेले असतील.

शालेय विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा असेच काहीसे प्लॅन तयार केलेले आहेत. सुट्ट्यांमध्ये धमाल करता यावीत यासाठी विद्यार्थी नेहमीच उत्सुक असतात.
दरम्यान डिसेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना चांगली धमाल करता येणार आहे कारण की या महिन्यात विद्यार्थ्यांना अनेक दिवस सुट्ट्या राहतील अशी माहिती समोर येत आहे.
अशा परिस्थितीत आता आपण डिसेंबर महिन्यात राज्यनिहाय विद्यार्थ्यांना किती दिवस आणि कोणत्या तारखांना सुट्ट्या राहणार याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत.
राजस्थानमध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार?
मिळालेल्या माहितीनुसार पंचवीस डिसेंबर ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत राजस्थानमध्ये हिवाळी सुट्ट्या राहणार आहेत. राजस्थान मधील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा या कालावधीत बंद राहणार आहेत.
थंडीची वाढती तीव्रता पाहता राजस्थान मधील शाळांना दरवर्षी हिवाळी सुट्टी जाहीर होते आणि यंदाही हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार?
यूपी मधील शाळांना 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच पीएम श्री शाळांमध्ये 23 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 दरम्यान हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या काळात यूपीच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी राहणार आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काही राज्यांमध्ये सुट्ट्या जाहीर होणार
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या जातील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी या राज्यांमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी सुट्ट्या जाहीर होतात आणि यंदाही याच कालावधीत हिवाळी सुट्ट्यांची घोषणा होणार आहे.













