विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळा आणि कॉलेजेस 30 जून पर्यंत बंद राहणार

CBSE बोर्डाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. CBSE बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून भरणार आहेत. यानंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. राज्य बोर्डाचे शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होईल आणि 16 जून पासून राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे.

Published on -

Schools Holidays : नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून 2025 पासून सुरू होणार आहे.

सी बी एस ई बोर्डाच्या शाळेतील उन्हाळी सुट्ट्या अर्जुन रोजी संपतील आणि नऊ जून पासून या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. याव्यतिरिक्त पुढील महिन्यात महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा देखील सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून 2025 पासून सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 16 जून ते 16 ऑक्टोबर 2025 यादरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या नव्या शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र आयोजित करण्यात आले आहे.

16 जूनला महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 सुरू होणार आहे. दुसरीकडे देशातील काही राज्यांमधील शाळांना 30 जून पर्यंत उन्हाळी सुट्ट्या राहणार आहेत.

या शाळा 30 जून पर्यंत बंद राहणार

मीडिया रिपोर्ट नुसार, पंजाबमधील तीव्र उष्णता लक्षात घेता पंजाब सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, मान्यताप्राप्त आणि खासगी शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. 2 जून ते 30 जून 2025 या कालावधीत पंजाब राज्यातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बंद राहणार आहेत.

या काळात राज्यभरातील सरकार, अनुदानित, मान्यताप्राप्त आणि खासगी संस्थांना उन्हाळी सुट्ट्या राहतील. खरेतर, भारतीय हवामान विभागाने पंजाबच्या काही भागांसाठी रेड अलर्ट दिला आहे, हवामान विभागाकडून पंजाब मध्ये पुढच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

उत्तर भारतातील उष्णतेची तीव्रता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे आणि उत्तर भारतातील याच हवामानामुळे पंजाब सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये ग्रीष्मकालीन म्हणजेच उन्हाळी सुट्टीची घोषणा केली आहे.

यासंदर्भात पंजाब सरकार कडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि या अधिकृत अधिसूचनेनुसार, राज्यातील सर्व सरकार, अनुदानित, मान्यताप्राप्त आणि खासगी शाळा 2 जून ते 30 जून 2025 या कालावधीत बंद राहतील.

पंजाब मधील अनेक भागांमधील तापमान 44° c च्या पार गेले आहे आणि हीच बाब लक्षात घेता हवामान विभागाकडून काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यामुळे पंजाब मधील शाळांना आणि कॉलेजेसला उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असून एक जुलैपासून पुन्हा एकदा शाळा भरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News