Share Buyback 2025 : सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण होत आहे. या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे सध्या शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत.
सोबतच काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हिडंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. अशातच आता गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना Multibagger परतावा देणाऱ्या एका कंपनीबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे.

नवा लिमिटेड कंपनीबाबत नुकतीच एक मोठी माहिती समोर आली आहे, मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी लवकरच शेअर बायबॅक करण्याची घोषणा करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या कंपनीच्या गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी बाबत आणि शेअर्स बाय बॅकच्या घोषणेबाबत? सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कंपनीने काय म्हटले ?
मित्रांनो, नवा लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज ला दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 19 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. दरम्यान याच महत्त्वाच्या बैठकीत शेअर बायबॅक करण्याबाबतची मोठी घोषणा होईल असा अंदाज व्यक्त होतोय.
कंपनीचे इक्विटी शेअर बायबॅक करण्याच्या प्रस्तावावर आज कंपनीच्या संचालक मंडळाकडून चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणून शेअर्सची बायबॅक जाहीर करून कंपनी गुंतवणूकदारांना भेट देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता आपण या कंपनीची गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी पाहूयात.
कशी राहिली शेअरची कामगिरी
या कंपनीने गेल्या पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1000 % परतावा दिला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये हा स्टॉक फक्त 130 ते 135 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मात्र सध्या हा स्टॉक 378 रुपयांवर ट्रेड करत असून 2023 च्या तुलनेत हा स्टॉक अनेक पटीने वाढला आहे.
यामुळे यातून गुंतवणूकदारांना नक्कीच चांगला परतावा मिळाला आहे. महत्वाची बाब म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये 673.35 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र त्यानंतर या स्टॉक मध्ये सातत्याने घसरण झाली आणि सध्या हा स्टॉक 378 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय.
दरम्यान आता या कंपनीकडून शेअर्स बायबॅक करण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे पुन्हा एकदा या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आला आहे. आज याबाबत कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सुद्धा होत आहे यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होईल? याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.