Share Market Dividend : शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सध्या तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तिमाही निकाल जाहीर करतानाच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा करत आहेत. तसेच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी डिव्हीडंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत.
प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ या कंपनीने देखील आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत अन आपल्या गुंतवणूकदारांसाठी कंपनीने डिव्हीडंड देण्याची घोषणा सुद्धा केली आहे. यामुळे सध्या या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आला असून आज आपण या कंपनीच्या घोषणेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ही कंपनी किती डिव्हीडंट देणार, यासाठीची रेकॉर्ड डेट काय आहे, या घोषणेनंतर कंपनीचे शेअर्सची स्थिती काय आहे आणि कंपनीचे तिमाही निकाल कसे राहिलेत? याच मुद्द्यांचा आता आपण आढावा घेणार आहोत.
कंपनी किती डिव्हीडंट देणार?
मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 80 रुपयांचा डिव्हिडंड अर्थात लाभांश देणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या कंपनीकडून यासाठीची रेकॉर्ड देखील जाहीर करण्यात आली आहे. लाभांश देण्यासाठीची रेकॉर्ड डेट 21 फेब्रुवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे.
याचा अर्थ असा की, यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्या शेअरहोल्डर्सची नावे या तारखेपर्यंत म्हणजेच 21 फेब्रुवारी पर्यंत कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणी किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये असतील त्या सर्व गुंतवणूकदारांना लाभांश दिला जाणार आहे. दरम्यान, 7 मार्च 2025 च्या आधीच या कंपनीकडून आपल्या पात्र गुंतवणूकदारांना लाभांश दिला जाईल अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.
गेल्या वर्षीही दिला होता लाभांश
खरे तर, या कंपनीने गेल्या वर्षीही म्हणजे 2024 मध्ये देखील आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीकडून पन्नास रुपयांचा अंतिम लाभांश आणि दीडशे रुपयांचा विशेष लाभांश जाहीर करण्यात आला होता. नंतर नोव्हेंबर 2024 मध्ये या कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना 60 रुपयांचा अंतिम लाभांश देण्यात आला होता.
शेअर बाजारातील कामगिरी कशी आहे?
आता आपण या कंपनीच्या स्टॉकची शेअर बाजारातील कामगिरी थोडक्यात समजून घेणार आहोत. बीएसईवर या कंपनीचे शेअर शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी 5224.55 रुपयांवर क्लोज झाला.
तर सोमवारी शेअर्स वधारून 5265.95 वर गेला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 8,600 कोटी रुपये आहे. शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5835.95 इतका आहे अन 52 आठवड्याची नीचांकी पातळी 4640.30 इतकी आहे.