Bonus Share : स्टॉक मार्केटच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. स्मॉल कॅप कंपनी ओरिएंट टेक्नॉलॉजीजमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमधील असंख्य कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट दिली जात आहे.
दरम्यान स्मॉल कॅप कंपनी ओरिएंट टेक्नॉलॉजी देखील आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर चे वितरण करणार असून यासाठीची रेकॉर्ड डेट 5 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब अशी की ही कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करणार आहे. त्यामुळे सध्या या कंपनीची जोरदार चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत आज आपण या शेअरची मार्केटमधील कामगिरी कशी आहे याचा आढावा येथे घेणार आहोत.

5 दिवसात मिळालेत 40 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
गेल्या आठवड्यात बाजार बंद होताना म्हणजेच शुक्रवारी हा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर दहा टक्क्यांनी वाढला. शुक्रवारी या स्टॉक ची किंमत 482 रुपयांच्या आसपास होती. महत्वाची बाब म्हणजे मागील पाच दिवसात या शेअर्सची जोरदार खरेदी झाली आहे आणि म्हणूनच गेल्या पाच दिवसांमध्ये या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 43% इतके जबरदस्त रिटर्न दिले आहेत. बोनस शेअरची घोषणा झाल्यापासून कंपनीचे स्टॉक तेजीत आहेत.
किती बोनस शेअर्स मिळणार
मिळालेल्या माहितीनुसार ओरिएंट टेक्नॉलॉजी आपल्या गुंतवणूकदारांना 1:10 च्या प्रमाणात बोनस शेअरचे वितरण करणार आहे. ही कंपनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली आणि अवघ्या काही महिन्यांमध्येच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटपाची घोषणा केली आहे.
या कंपनीच्या शेअरची किंमत आयपीओ मध्ये 206 रुपये एवढी होती. ज्या दिवशी हा स्टॉक लिस्ट झाला त्या दिवशी याची किंमत 304 रुपये एवढी होती. पण सध्या स्थितीला हा स्टॉक 482 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. या कंपनीच्या मार्केट कॅपिटल बाबत बोलायचं झालं तर याचे सध्याचे बाजार मूल्य 1970 कोटी रुपये इतके असल्याची नोंद करण्यात आली आहे.











