शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! एका शेअरवर 100 रुपयांचा डिव्हीडंट, या कंपनीचे स्टॉक आज फोकस मध्ये

Hero MotoCorp Ltd चे शेअर्स बुधवारी एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग करत आहेत. टू-व्हीलर कंपनीच्या कंपनी बोर्डाने, 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही निकालांसह, कंपनीच्या पात्र भागधारकांसाठी 5,000 टक्के म्हणजे 100 रुपये प्रति शेअर इतका मोठा लाभांश जाहीर केला होता.

Tejas B Shelar
Published:

Share Market News : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने चालू आर्थिक वर्षात आपल्या शेअर होल्डर साठी अर्थातच भागधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हीडंट दिला जाणार आहे.

म्हणून Hero MotoCorp चे शेअर्स आज 12 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये राहणार आहेत. आज कंपनी विशेष लाभांश देत आहे. Hero MotoCorp Ltd चे शेअर्स बुधवारी एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग करत आहेत.

टू-व्हीलर कंपनीच्या कंपनी बोर्डाने, 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही निकालांसह, कंपनीच्या पात्र भागधारकांसाठी 5,000 टक्के म्हणजे 100 रुपये प्रति शेअर इतका मोठा लाभांश जाहीर केला होता.

कंपनीचे शेअर्स आज 4,020 रुपयांवर व्यवहार करत आहेत. यामध्ये थोडीशी घट झाली आहे. दरम्यान आज आपण कंपनीने डिव्हीडंट देण्याबाबत नेमकी काय घोषणा केली आहे? याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत.

कधी केली होती घोषणा?

गुरुवार, 6 फेब्रुवारी 2025 रोजी, Hero MotoCorp च्या कंपनी बोर्डाने 5000 टक्के अंतरिम लाभांशाचा विचार केला आणि त्याला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय देखील बोर्डाने घेतला. 2024-25 आर्थिक वर्षासाठी 100 प्रति इक्विटी शेअर, प्रत्येकाचा फेस वॅल्यू 2 रुपये आहे.

कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये असे म्हटले आहे की, कंपनी बोर्डाने अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशाने सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच आज या डिव्हीडंट साठीची रेकॉर्ड डेट आहे.

कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये आज ज्यांच्याकडे शेअर्स असतील त्यांना याचा लाभ मिळणार आहे. लाभांशाचे पेमेंट/डिव्हिडंड वॉरंटचे वितरण 08 मार्च 2025 पर्यंत पूर्ण केले जाईल,” असे सुद्धा फाइलिंगमध्ये म्हटले गेले आहे.

शेअर बाजारातील सध्याची स्थिती

Hero MotoCorp कंपनीच्या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती आता आपण पाहूयात. याचे शेअर्स सप्टेंबर 2024 मध्ये 6,245 रुपयांवर होते जो की याचा 52 आठवड्यांच्या उच्चांक आहे. पण आता याचे स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीपासून जवळपास 35 टक्क्यांनी घसरले आहेत.

कंपनीने 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत नफ्यात 12 टक्के वार्षिक (YoY) वाढ नोंदवली आहे. या ऑटो कंपनीने Q3FY25 मध्ये 10,211 कोटी रुपयांची कमाई नोंदवली, ज्याने वार्षिक 5 टक्के वाढ नोंदवली आहे.

तिमाहीत एबिटा 8.4 टक्क्यांनी वाढून 1,476 कोटी रुपयांवर पोहोचला, तर मार्जिन तिमाहीत 50 बेस पॉइंट्सने वाढून 14.5 टक्क्यांवर पोहोचले आहे. एकंदरीत आज कंपनीकडून डिव्हीडंट दिला जाणार असल्याने हा स्टॉक शेअर बाजारात फोकस मध्ये राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe