Share Market News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सर्वसामान्य गुंतवणूकदार मोठ्या कंपन्या पाहतात. पण आता तज्ञांनी फक्त मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करता भविष्यात चांगला व्यवसाय करण्याची क्षमता ठेवणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
पोर्टपोलिओ मध्ये काही अशा छोट्या कंपन्यांचे सुद्धा शेअर्स असायला हवेत जे की येत्या काळात चांगले रिटर्न देऊ शकतात. दरम्यान आज आपण तज्ञांनी सुचवलेल्या काही शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत.

ट्रेंडलाईनने नुकताच एक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये निफ्टी 500 मधील निवडक शेअर्स मध्ये 50% पेक्षा अधिक तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आपण याच निवडक शेअर्समधील पाच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत.
आज आपण ज्या शेअर्स विषयी जाणून घेणार आहोत ते गुंतवणूकदारांना कमाल 78% पर्यंत रिटर्न देऊ शकतात असा अंदाज आहे. सोबतच या शेअर्सला पाच पेक्षा जास्त तज्ञांनी बाय रेटिंग सुद्धा दिलेली आहे.
हे शेअर्स बारा महिन्यात बनवणार श्रीमंत
आयनॉक्स विंड : गेल्या काही वर्षांमध्ये सौर आणि पवन ऊर्जेचा वापर वाढला आहे. ही कंपनी सुद्धा पवन ऊर्जा क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे. येत्या काळात या क्षेत्रात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने तज्ञांनी या शेअर साठी सकारात्मक कौल दिला आहे.
शेअरची करंट मार्केट प्राइस 114 रुपये इतकी आहे. पण तज्ञांनी यासाठी 203 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे अर्थात येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 78% रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
कोहन्स लाइफसायन्स : कोरोना काळापासून हेल्थ सेक्टरकडे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे देखील अशीच एक हेल्थ सेक्टरमधील बडी कंपनी आहे. ही कंपनी फार्मा सेक्टर मध्ये म्हणजेच औषध निर्माण क्षेत्रात कार्यरत आहे.
हा स्टॉक सध्या 476 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. पण यासाठी 801 रुपयांची टार्गेट प्राईस आहे. अर्थात येत्या काळात यामधून 68 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.
आदित्य बिरला रियल इस्टेट : रिअल इस्टेटचे क्षेत्र नेहमीच फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे अनेकजण या सेक्टरमधील शेअर्स मध्ये गुंतवणूक करू इच्छितात. तुमचा पण रियल इस्टेट सेक्टरमधील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आदित्य बिर्ला रिअल इस्टेटवर विश्वास दाखवू शकता.
या शेअरची करंट मार्केट प्राइस 1621 रुपये आहे. यासाठी 2654 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. अर्थात पुढील बारा महिन्यांच्या काळात हा स्टॉक 64% पर्यंत वाढू शकतो असा अंदाज आहे.
एनसीसी : ही कंपनी पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये कार्यरत आहे. रेल्वे, रस्ते, इमारत अशा वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये हिचे काम सुरु आहे. या कंपनीचा स्टॉक सध्या 149 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहे. यासाठी 235 रुपयांची टार्गेट प्राईस सेट करण्यात आली आहे. अर्थात येत्या काही महिन्यांनी या स्टॉक मध्ये 58% पर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
कायेन्स टेक्नॉलॉजी : हा शेअर 3660 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहे. यासाठी 5787 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे. अर्थात येत्या काळात यामधून गुंतवणूकदारांनी 58% रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.













