‘या’ शेअर्सने 6 महिन्यात दिलेत 463% रिटर्न ! आता कंपनी देणार बोनस शेअर्स, वाचा सविस्तर

Published on -

Share Market News :  शेअर मार्केट मधून कमाईची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरंतर शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी लाभांश देण्याची तसेच बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली जात असते.

या कॉर्पोरेट बेनिफिट्समुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळत असतो. यामुळे शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार नेहमीच बोनस शेअर्स तसेच लाभांशी देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात. अनेक जण अशा कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणूक चांगली कमाई करतात.

तुम्ही सुद्धा गुंतवणुकीसाठी अशाच कॉर्पोरेट बेनिफिट देणाऱ्या कंपनीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आली आहे. सॅम्प्रे न्यूट्रिशन्स लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.

खरंतर या कंपनीकडून स्टॉक स्प्लिटची पण घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण कंपनीच्या या घोषणाची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तसेच यासाठीच्या रेकॉर्ड डेटची पण माहिती पाहणार आहोत. 

कंपनीची शेअर मार्केट मधील कामगिरी 

शेअर मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठी अस्थिरता दिसत आहे. भू राजकीय तणावामुळे तसेच अमेरिकेच्या धोरणांमुळे शेअर मार्केट मध्ये उलथापालथ होत आहे. मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये बुडाले आहेत.

पण अशा या स्थितीत सुद्धा काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरत आहेत. सॅम्प्रे न्यूट्रिशन्स लिमिटेडचे शेअर्सने सुद्धा मागील सहा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून दिला आहे.

या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या सहा महिन्यात 463% रिटर्न मिळाले आहेत तसेच तीन महिन्यांच्या काळात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 132 टक्के रिटर्न दिले आहेत. त्याचवेळी गेल्या एका वर्षाच्या काळात गुंतवणूकदारांना 51% रिटर्न मिळाले आहेत.

पण कंपनीची गेल्या काही महिन्यांची कामगिरी फारशी खास राहिलेली नाही. मागील दोन आठवड्यात कंपनीच्या शेअरची किंमत 16 टक्क्यांनी कमी झाली आहे. सध्या या कंपनीचे स्टॉक 168 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतायेत. 

बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा

कंपनीने आता आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट ची घोषणा केली आहे. कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या एका शेअरचे विभाजन दोन शेअर्समध्ये करणार आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 5 रुपये प्रति शेअर होणार आहे.

शिवाय कंपनी 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे. म्हणजे कंपनीच्या एका शेअर मागे एक शेअर बोनस मिळेल. यासाठी कंपनीने त्या चार दिवसांची डेट रेकॉर्ड डेट म्हणून फायनल केली आहे. अर्थात 14 नोव्हेंबर ही यासाठीची रेकॉर्ड डेट राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News