जिओ फायनान्शिअल सर्विसेससह ‘या’ कंपनीची निफ्टी 50 मध्ये एन्ट्री होणार ! कोणत्या कंपन्या होणार बाहेर? वाचा…

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक कामाची अपडेट समोर येत आहे. निफ्टी 50, 100 आणि 200 मध्ये मोठा बदल पाहायला मिळणार असून यातील अनेक कंपन्या बाहेर पडणार आहेत तर काही नव्या कंपन्यांची यात एन्ट्री होणार आहे.

Published on -

Share Market News : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

अशातच स्टॉक मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता निफ्टी 50 मध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार आहेत. यातून काही कंपन्या एक्झिट होतील तर काही कंपन्यांची इंट्री होणार आहे.

निफ्टी 50 सोबतच निफ्टी 100 अन निफ्टी 200 मध्ये सुद्धा बदल पाहायला मिळणार आहे. काल 21 फेब्रुवारी 2025 ला एनएसईने याबाबत माहिती दिली. दरम्यान निफ्टी मध्ये होणारा हा बदल 28 मार्च 2025 पासून लागू होणार असल्याचीही बातमी समोर येत आहे.

अशा स्थितीत आता आपण निफ्टी 50 मध्ये कोणत्या कंपन्यांची इंट्री होणार आणि कोणत्या कंपन्यांची एक्झिट होणार याबाबत माहिती पाहणार आहोत. निफ्टी 100 अन निफ्टी 200 मध्ये होणाऱ्या बदलाची देखील आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

निफ्टी 50 मध्ये कोणाची एन्ट्री आणि कोणाची एक्झिट

निफ्टी 50 मध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आणि फिनटेक कंपनी जिओ फायनान्शिअल सर्विसेस या दोन कंपन्यांची एन्ट्री होणार आहे. या कंपन्या सरकारी कंपनी इंडियन पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि FMCG क्षेत्रातील कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजची जागा घेणार आहेत. यामुळे हा निफ्टी 50 इक्वलवेट इंडेक्स दिसणार आहे.

निफ्टी 200 मध्ये काय बदल होईल?

ग्लेनमार्क फार्मा, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस, नेशनवाइड ॲल्युमिनियम कंपनी आणि एनटीपीसी ग्रीन एनर्जी, ओला इलेक्ट्रिक आणि प्रीमियर एनर्जी निफ्टी 200 मध्ये सामील होणार आहेत.

दुसरीकडे बाळकृष्ण इंडस्ट्रीज, Delhivery, फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, एमआरपीएल, एलसी इंडिया, पूनावाला फिनकॉर्म, सुंदरम फायनान्स आणि केमिकल्स या कंपन्या यातून बाहेर पडणार आहेत.

निफ्टी 100 मध्ये काय बदल होणार ?

निफ्टी 100 मध्ये सुद्धा अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स, सीजी पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्युशन्स, ह्युंदाई मोटर्स निफ्टी 100 निर्देशांकात समाविष्ट होणार आहेत.

त्याच वेळी, अदानी टोटल गॅस, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC), नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) आणि युनियन बँक ऑफ इंडिया निफ्टी 100 मधून बाहेर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe