मार्केट कितीही पडू द्या, ‘हे’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! तज्ञांनी सुचवलेले Top 5 स्टॉक

शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही ऍक्सीस सेक्युरिटीज या ब्रोकरेजने सुचवलेल्या टॉप 5 स्टॉक बाबत माहिती सांगणार आहोत. 

Published on -

Share Market : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. कधी मार्केट वर जाते तर कधी खाली येते. खरे तर शेअर मार्केटचा स्वभाव आहे तसाच. पण शेअर मार्केट मधील ही चढ उतार गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी आहे.

दरम्यान अशा या परिस्थितीमध्ये ज्या कंपन्यांचे फंडामेंटल मजबूत असतात त्या कंपन्यांचे स्टॉक खरेदी करायला हवेत असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.

कारण की, मार्केट कितीही पडले तरीदेखील असे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना चांगले भरीव रिटर्न देतात. यामुळे अनेकजण कंपन्यांचे फंडामेंटल आधी चेक करतात, ज्या कंपन्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात त्याच कंपन्यांवर गुंतवणूकदार विश्वास दाखवतात.

म्हणूनच जर तुम्हीही मजबूत फंडामेंटल असणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्सच्या शोधात असाल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे. कारण आज आपण ऍक्सीस सेक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मकडून सुचवण्यात आलेल्या टॉप पाच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. 

हे टॉप 5 स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल 

PB Fintech : तुम्हाला ही कंपनी नवखी वाटत असेल पण ही कंपनी पॉलिसीबाजार आणि पैसाबाजार यांसारखे प्लॅटफॉर्म चालवते. ही फिनटेक सेक्टर मधील एक आघाडीची कंपनी बनली आहे. सध्या स्थितीला या कंपनीचा स्टॉक 1800 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय.

पण Axis सेक्युरिटीज या ब्रोकरेजकडून या स्टॉक ला बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजे स्टॉक खरेदीचा सल्ला दिला जातोय. हा स्टॉक 1820 रुपयांपर्यंत खरेदी करा आणि 2015 चे टार्गेट सेट करा. यासाठी 1755 रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे. 

Star Cement : या यादीत स्टार सिमेंटचा सुद्धा समावेश होतो. ऍक्सिस सेक्युरिटीज ब्रोकरेजकडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. हा स्टॉक सध्या 241 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय पण यासाठी 263 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित करण्यात आली आहे आणि 231 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

Chemcon Speciality Chemicals : ऍक्सिस सेक्युरिटीज ब्रोकरेजकडून या स्टॉक साठी सुद्धा बाय रेटिंग देण्यात आली आहे. सध्या हा स्टॉक 243 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. मात्र यासाठी 285 रुपयांचे टार्गेट प्राईज निश्चित करण्यात आले आहे आणि 225 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Sudarshan Chemical : सध्या हा स्टॉक 1449 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. या स्टॉक साठी ब्रोकरेज कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. यासाठी 1565 रुपयांचे टार्गेट प्राईज आणि 1404 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Sumitomo Chemical : या यादीत Sumitomo केमिकल या कंपनीच्या स्टॉकचाही समावेश होतो. हा स्टॉक सध्या 651 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय आणि ॲक्सिस सेक्युरिटीच ब्रोकरेज कडून याला बाय रेटिंग देण्यात आली आहे. यासाठी 755 रुपयांचे टार्गेट प्राईस आणि 620 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!