Share Market Tips : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे. खरं पाहता शेअर मार्केटमध्ये लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ञ लोकांच्या माध्यमातून दिला जातो. मात्र, आज आपण एका अशा स्टॉक विषयी जाणून घेणार आहोत ज्याने मात्र एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के रिटर्न दिले आहेत.
विशेष म्हणजे काही ब्रोकरेज हाऊस ने या स्टॉक मध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आता तुम्हाला देखील वाटतात जाणून घ्यायचं असेल ना! चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा स्टॉक.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो धोका वाढला ! ‘हे’ तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस अन गारपीट होणार; पंजाब डख यांचा अंदाज
कोणता आहे हा स्टॉक?
आम्ही ज्या स्टॉकबाबत बोलत आहोत तो आहे झोमॅटोचा. झोमॅटोच्या स्टॉकने गेल्या एक महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 16 टक्के रिटर्न दिले आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यात झोमॅटो चे शेअर्समध्ये दहा टक्के घसरण झाली आहे तर गेल्या एका वर्षात या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे 23 टक्के नुकसान झाले आहे.
पण आता हा स्टॉक पुढे चांगली कामगिरी करेल असा आशावाद काही ब्रोकरेज हाऊस कडून व्यक्त होत आहे. चला तर मग आता जाणून घेऊया कोणत्या ब्रोकरेज हाऊसने या शेअर्समध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :- कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाचे ‘हे’ बियाणे खरेदी करू नका, नाहीतर…; कृषी विभागाचा मोलाचा सल्ला
या ब्रोकरेज हाऊस ने दिले बाय रेटिंग
झोमॅटोच्या शेअरला ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक सिटीने बाय रेटिंग दिले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या ब्रोकरेज हाऊस ने हे बाय रेटिंग दिले आहे. या ब्रोकरेज हाऊस ने झोमॅटोचा स्टॉक 76 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे. अर्थातच या स्टॉक मध्ये 30 टक्के वाढ होण्याची शक्यता या ब्रोकरेज हाऊसने व्यक्त केली आहे.
यासोबतच आणखी एका ब्रोकरेज हाऊस ने झोमॅटोच्या शेअरमध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :- खुशखबर! भारतीय नौदलात ‘या’ पदासाठी भरती; पात्रता फक्त 10वी पास अन पगार मिळणार तब्बल 63 हजार, वाचा सविस्तर
मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज हाऊस ने गत आठवड्यात या शेअरला बाय रेटिंग दिली होती. तसेच हा शेअर 70 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे या ब्रोकरेज हाऊस ने म्हटलं होतं. या ब्रोकरेज हाऊसच्या मते भविष्यात या शेअरमध्ये कॉम्पिटिशन असताना देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो आम्ही फक्त शेअरच्या परफॉर्मन्स बाबत माहिती देत असतो. येथे दिलेली माहिती हा गुंतवणुकीचा सल्ला नव्हे याची काळजी गुंतवणूकदारांनी घ्यायची आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे जरुरीचे आहे.
हे पण वाचा :- एमपीएससी ग्रुप बी – ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर ! ‘या’ दिवशी होणार परीक्षा, पहा परीक्षा केंद्रांची यादी