शेअर बाजारातील गुंतवणूकदार बनणार मालामाल ! ‘हा’ सरकारी कंपनीचा 320 रुपयांचा स्टॉक लवकरच 430 रुपयांवर जाणार

शेअर बाजारात सूचीबद्ध असणारे अनेक स्टॉक देखील तेजीत आले आहेत. आज एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर सुद्धा तेजीत आलाय, महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात हा स्टॉक आणखी वधारणार असल्याचे बोलले जात आहे.

Tejas B Shelar
Published:

Share Market Tips : शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी पाहायला मिळाली आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. आज शनिवार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 530.12 अंकांनी वधारून 77289.93 वर अन एनएसई निफ्टी 164.00 अंकांनी वधारून 23413.50 वर खुला झाला.

शेअर बाजारात सूचीबद्ध असणारे अनेक स्टॉक देखील तेजीत आले आहेत. आज एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर सुद्धा तेजीत आलाय, महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात हा स्टॉक आणखी वधारणार असल्याचे बोलले जात आहे. ब्रोकरेजकडून या स्टॉकसाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे तसेच नवीन टार्गेट प्राईज सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण या स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील परिस्थिती अन आगामी काळात हा स्टॉक कुठपर्यंत जाऊ शकतो याबाबतचा ब्रोकरेज चा अंदाज नेमका काय सांगतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

एनटीपीसी लिमिटेड कंपनीची शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती

हा स्टॉक सध्या तेजीत आलाय. एक फेब्रुवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर 0.22 टक्क्यांनी वधारला अन सध्या हा स्टॉक 323.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. याची प्रिव्हियस क्लोजिंग प्राईस 323.00 रुपये होती.

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 448.45 रुपये अन शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 296.85 रुपये इतका राहिला. सध्या या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,15,093 Cr. रुपये इतके आहे, तसेच सध्या या कंपनीवर 2,42,009 Cr. रुपये इतकं कर्ज आहे.

या स्टॉकने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला आहे?

एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा स्टॉक मागील 5 दिवसात एनटीपीसी लिमिटेड शेअर 1.66 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच मागील 1 महिन्यात -2.98 टक्क्यांनी अन मागील 6 महिन्यात -23.56 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 1 वर्षात हा शेअर 0.53 टक्क्यांनी वाढला आहे.

पण YTD आधारावर एनटीपीसी लिमिटेड शेअर -2.98 टक्क्यांनी घसरला आहे. मागील 5 वर्षात एनटीपीसी लिमिटेड शेअर 196.70 टक्क्यांनी अन लॉंग टर्ममध्ये हा स्टॉक 414.14 टक्क्यांनी वाढला आहे.

आता किती वाढणार किंमत

एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने ‘Buy’ रेटींग जाहीर केली आहे. अर्थातच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीने या शेअरसाठी 430 रुपयांची टार्गेट प्राईस सुद्धा दिली आहे. यामुळे आता खरच हा स्टॉक 430 रुपयांपर्यंत पोहोचणार का? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe