Share Market Tips : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर नवीन वर्षाची शेअर बाजाराची सुरुवात ही चढउताराची राहिली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात मोठी तेजी आली होती. पण नंतर शेअर बाजारात घसरण झाली.
आता गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. अशातच मात्र सुझलॉन एनर्जी कंपनीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या कंपनीने काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी स्टॉक एक्सचेंज ला फायलिंग मध्ये माहिती देतांना आपल्या एका कॉन्ट्रॅक्टचा उल्लेख केला आहे.
या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा एक मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला असून यामुळे आगामी काळात या कंपनीचे शेअर रॉकेटसारखा तेजीत येईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान आता आपण या कंपनीला नेमका कोणता कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे ? कंपनीच्या पाच वर्षांची कामगिरी कशी राहिली आहे? देशांतर्गत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीच्या बाबतीत कंपनीची कामगिरी कशी राहिली आहे? याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत.
सुझलॉन एनर्जीला नुकताच एक मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. या कंपनीला टोरेंट पॉवर लिमिटेड या कंपनीकडून 486 मेगावॅटसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या नव्याने प्राप्त झालेल्या कॉन्ट्रॅक्टमुळे सुझलॉन एनर्जीची एकूण ऑर्डर बुक एक गिगावॅट इतकी झाली आहे.
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला 28 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी आपले तिमाही निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे अन सुझलॉन ग्रुप आणि टोरंट पॉवर लिमिटेड या दोन कंपन्यांनी एक महत्त्वपूर्ण पार्टनरशिप सुद्धा जाहीर केली आहे.
या पार्टनरशिप अंतर्गत एकत्रितपणे एकूण 1 गिगावॅट पवन ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. कंपनीला प्राप्त झालेल्या या कॉन्ट्रॅक्टमुळे या शेअरच्या परफॉर्मन्स मध्ये सुधारणा पाहायला मिळेल आणि याची किंमत आगामी काळात वाढू शकते.
शिवाय गेल्या एका वर्षभरामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून ही गुंतवणूक आता 17.83 टक्क्यांवरून 22.87 टक्क्यांवर पोहोचली आहे.
सोबतच डीआयआय म्हणजेच देशांतर्गत गुंतवणूकदारांनी देखील सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या शेअर्समधील हिस्सेदारी 9.02 टक्क्यांवरून 9.31 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. म्हणून या साऱ्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम या शेअरच्या कामगिरीवर पाहायला मिळू शकतो.
यामुळे आगामी काळात या शेअरच्या किमतीत वाढ होऊ शकते, यामध्ये तेजी येऊ शकते असे चित्र सध्या तयार होत आहे. या स्टॉकच्या कामगिरी बाबत बोलायचं झालं तर काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 24 जानेवारी रोजी शेअरची किंमत 2.82 टक्क्यांनी घसरून 52.78 रुपयांवर आली आहे.
मागील आठवडाभरात हा शेअर 7.13 टक्क्यांनी घसरलाय अन मागील एका महिन्यात हा शेअर 17.97 टक्के घसरला आहे. तसेच YTD आधारवर सुझलॉन एनर्जी शेअर 19.21 टक्क्यांनी घसरला आहे.
पण, वर्षभरात या शेअरने 24.04 टक्के एवढा परतावा दिला आहे. दरम्यान पुढील काळ या कंपनीसाठी फायद्याचा राहणार असे दिसत आहे यामुळे यामध्ये केलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांना फायद्याची ठरू शकते असे चित्र सध्या तरी दिसत आहे.