Share Market Vs Bank FD : सध्या भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत आणि यामुळे आता शेअर बाजारात पैसे लावण्यासाठी अनेक गुंतवणूकदार धजावत नसल्याची वास्तविकता नाकारून चालणार नाही.
दरम्यान जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे हैरान असाल आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या विचारात असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे.

शेअर मार्केट मधील घसरणीच्या काळात जर तुम्हाला तुमचा पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा असेल तर तुम्ही एफडी करू शकतात. दरम्यान आज आपण देशातील अशा टॉप 5 बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी डिटेल माहिती.
या बँका देतात एफडीवर सर्वाधिक व्याज
HDFC : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी बँक. ही प्रायव्हेट बँक सर्वात सुरक्षित बँक म्हणून ओळखली जाते, आरबीआयने देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत या बँकेला सुद्धा ठेवल आहे. ही बँक 18 महिने ते 21 महिने कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75 टक्के दराने व्याज देत आहे.
Federal Bank : या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येते फेडरल बँक. फेडरल बँकेची 444 दिवसांची एफडी योजना ही बँकेची सर्वाधिक परतावा देणारी योजना म्हणून ओळखली जाते. ही बँक 444 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.50% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8% दराने व्याज देते.
ICICI Bank : आयसीआयसीआय बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक. एचडीएफसी प्रमाणे आरबीआयने या बँकेला देखील देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत ठेवला आहे.
ही प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना पंधरा महिने ते 18 महिने कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करते. या एफडीवर बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7.25 टक्के दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.85% दराने परतावा दिला जात आहे.
Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदा दोन वर्ष ते तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करते. ही बँक या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7.15% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.65 टक्के दराने परतावा देत आहे. म्हणूनच या यादीत आम्ही बँक ऑफ बडोद्याला चौथ्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया : युनियन बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देते. ही बँक 456 दिवसांच्या एफडीवर आपल्या सामान्य ग्राहकांना 7.30% दराने आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.80% दराने व्याज ऑफर करत आहे.