नाशिकच्या कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण ! 2 दिवसात गुंतवणूकदारांना बसला 40 टक्क्यांचा फटका, घसरणीचे कारण काय?

Published on -

Condom Maker Company Share Price : 2025 हे वर्ष शेअर मार्केट साठी मोठे निराशा जनक राहिले आहे. गेल्यावर्षी मार्केटमध्ये मोठी अस्थिरता दिसून आली आणि यामुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे आता 2020 या वर्षात मार्केट कसे राहणार ? याकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे.

अशातच आता मार्केट मधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कंडोम बनवणाऱ्या एका कंपनीच्या शेअर्स मध्ये मागील काही दिवसात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या काळात क्युपिड लिमिटेड या कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली होती आणि आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात 5 जानेवारी 2026 रोजी पुन्हा एकदा या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली आहे

सुरुवातीचे दोन्ही सत्र या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरन झाली आणि म्हणूनच आता गुंतवणूकदारांमध्ये सध्या या कंपनीच्या शेअर बाबत चिंतेचे वातावरण आहे. आज हा स्टॉक 337 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. दरम्यान आज आपण या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने एवढी मोठी घसरण का होत आहे याचाच आढावा घेणार आहोत.

काय आहे कारण?

बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एनएसई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजने Cupid Limited ला बराच काळ अतिरिक्त देखरेख उपायांच्या (एएसएम) पहिल्या टप्प्यात ठेवले होते. दरम्यान या कारणांमुळे हे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले गेलेत. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.

दरम्यान याच घसरणीच्या पार्श्वभूमीवर क्युपिड शेअर्सवरील मार्जिन दर 6 जानेवारी 2026 पासून 100% पर्यंत वाढवण्यात आला असून जाणकार लोकांनी हे पाऊल सामान्यतः अत्यंत अस्थिर असलेल्या शेअर्स वर लक्ष ठेवण्यासाठी उचलले जाते अशी माहिती दिली आहे. दरम्यान या शेअर्सवर असणारा विक्रीचा दबाव अजूनही कायम आहे.

खरे तर गेल्या वर्षी या कंपनीच्या शेअर्समध्ये 375 टक्के वाढ झाली होती. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ही सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या कंपन्यांपैकी एक असून 15 डिसेंबर 2025 ते एक जानेवारी 2026 दरम्यानच्या खरेदीच्या सत्रानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. या कंपनीचे प्रोडक्शन युनिट हे नाशिक जिल्ह्यात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News