शिमला-मनाली काहीच नाही ! एप्रिलमध्ये पिकनिकचा प्लॅन असेल तर ‘या’ चार ठिकाणी आवर्जून भेट द्या

एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि आता पर्यटकांचे पाय आपसूक थंड हवेच्या ठिकाणांकडे वळणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण भारतातील प्रमुख चार थंड हवेच्या ठिकाणांची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Picnic Spot In India : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे आणि आता उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. एप्रिल महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जण या महिन्यात पिकनिकचा प्लॅन बनवताना दिसतील. किंबहुना अनेकांचा प्लॅन रेडी सुद्धा झाला असेल. दरम्यान जर तुम्ही ही एप्रिलमध्ये पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण उन्हाळी पिकनिक साठी देशातील चार प्रमुख डेस्टिनेशन ची माहिती पाहणार आहोत. समर व्हेकेशनमध्ये पिकनिकचा विषय निघाला की शिमला मनाली आणि जम्मू-काश्मीर सारख्या ठिकाणांची आठवण होते. मात्र आज आपण अशा चार पिकनिक स्पॉटची माहिती जाणून घेणार आहोत जिथे भेट दिल्यानंतर तुम्हाला शिमला आणि मनालीची सुद्धा आठवण येणार नाही.

या चार लोकप्रिय ठिकाणांना आवर्जून भेट द्यालेह-लडाख : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे आणि यामुळे अनेक जण हैराण झाले आहेत. दरम्यान वाढत्या तापमानाने त्रस्त झालेले अनेक लोक सध्या पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. तुमचा एप्रिल महिन्यात पिकनिकचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी लेह लडाख हे ठिकाण फायद्याचे ठरणार आहे. रोमांचक प्रवास आणि साहसी अनुभव हवा असेल, तर तुम्ही या डेस्टिनेशनला आवर्जून भेट द्यायला हवी. हे जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक मानले जाते. भारतातील सर्वात शांत अन निसर्गरम्य ठिकाण म्हणून या ठिकाणाची ओळख. येथे शांत तिबेटी मठ, नितळ निळ्या रंगाची सरोवरे आणि निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. यामुळेच साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींचे हे आवडते ठिकाण आहे.

काश्मीर : याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात. म्हणूनच जर तुम्ही उन्हाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर काश्मीरचा विचार तुम्ही नक्कीच करायला हवा. हे निसर्गप्रेमींसाठी एक स्वप्नवत ठिकाण मानले जाते. श्रीनगर, गुलमर्ग आणि सोनमर्गसारखी ठिकाणे पाहिल्यावर पर्यटकांना येथे पुन्हा येण्याची ओढ लागते. उन्हाळ्यात येथे आल्यानंतर मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होते. या ठिकाणी एकदा भेट दिली की तुम्ही वारंवार येथे जाण्यास उत्सुक राहाल.

दार्जिलिंग : भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन्सपैकी एक म्हणजे दार्जिलिंग. एप्रिल-मे महिन्यात येथे हवामान आल्हाददायक असते. यामुळे एप्रिल महिन्यात पिकनिकचा प्लॅन असेल तर दार्जिलिंग तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच ऍड करा. येथील सर्वात मोठी विशेषता म्हणजे मोठमोठ्या चहा बागा, टायगर हिल, रॉक गार्डन, हैप्पी व्हॅली टी एस्टेट आणि दार्जिलिंग हिमालयन रेल्वे.

ऊटी : दक्षिण भारतातही थंड हवेची ठिकाणे आहेत. तामिळनाडू मधील ऊटी हे दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण. येथे आल्यानंतर थंडगार हवामानाचा अनुभव घेता येतो. कॉफी व चहा बागांचे सौंदर्य, दाट जंगलं आणि ढगांनी वेढलेले डोंगर हे ऊटीचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये उटीचा उल्लेख पाहिला असेल आणि याचे दृश्यही पाहिले असतील. त्यामुळे जर तुमचा एप्रिलमध्ये पिकनिकचा प्लॅन असेल तर तुम्ही या डेस्टिनेशनचा सुद्धा विचार करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe