Shirdi News : फेब्रुवारी महिन्यात मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. यामुळे मुंबई ते शिर्डी चा प्रवास जलद झाला असून साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची यामुळे मोठी सोय झाली आहे. दरम्यान साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आणखी एक मोठ गिफ्ट मिळालं आहे.
शिर्डी विमानतळावर आता रात्री देखील विमानाची लँडिंग होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चा शिर्डी विमानतळावर नाईट लाँडिंगचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. आजपासून शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग होणार आहे. त्यामुळे विमानाने शिर्डी जाणाऱ्या भाविकांसाठी ही एक आनंदाची पर्वणी सिद्ध होणार आहे. या निर्णयामुळे साईबाबांचे दर्शन भाविकांना सकाळीच आणि वेळेत घेता येणार आहे.
हे पण वाचा :- दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! या विभागात निघाली मोठी भरती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज
नाईट लँडिंग ची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली असल्याने या निर्णयाचा लाखो भाविक भक्तांना फायदा होणार आहे. खरं पाहता शिर्डीमध्ये देशभरातून रोजाना हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यामधून अनेक जण विमानाने प्रवास करतात. या विमान प्रवाशांची मात्र नाईट लँडिंगची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची होती.
आता मात्र यावर निर्णय घेण्यात आला असून शिर्डीमध्ये नाईट लँडिंगला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आता ज्या भाविक भक्तांना सकाळी काकड आरतीला उपस्थित राहण्याची इच्छा असेल त्यांना आदल्या दिवशी शिर्डीत जाण्याची गरज राहणार नाही. रात्री शिर्डी विमानतळावर पोहोचून भाविकांना आता सकाळी काकड आरतीचा लाभ घेता येणार आहे.
हे पण वाचा :- शिंदे सरकार ‘या’ एका कारणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करणार, पहा….
यामुळे शासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे. दरम्यान शासनाचा हा निर्णय शिर्डी येथील अर्थकारणाला चालना देणारा राहणार असून यामुळे परिसराचा विकास सुनिश्चित होणार असल्याचे मत तज्ञ लोकांकडून व्यक्त होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिर्डी विमानतळावर ८ एप्रिल म्हणजे आजपासून नाईट लँडिंग सुरू होत असून दिल्लीहून इंडिगो कंपनीचे पहिले विमान रात्री आठ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर उतरणार आहे. आता शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू झाली असल्याने रात्रीच्या अनेक नवीन विमानसेवा आगामी काळात सुरु होतील आणि यामुळे भाविकांचा प्रवास सोयीचा होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- संपात सामील झालेल्या 18 लाख कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शिंदे-फडणवीस सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, पहा….